ऑपरेशन टायगरनंतर 6 बंडखोर खासदारांचा पहिला फोटो समोर;समोर बसलेला बडा नेता कोण? सस्पेन्स कायम!

UBT Splite rebel MPs First photo खासदारांचा बंडानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमुळे मात्र आणखी सस्पेन्स वाढला आहे.

UBT Splite Rebel MPs First Photo

UBT Splite Rebel MPs First Photo

UBT Splite rebel MPs First photo after ‘Operation Tiger’ who senior leader seated in front suspense remains : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटले आहेत. या खासदारांनी स्वतंत्र गट असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहेत. हे खासदार सध्या ऑपरेशन टायगर अंतर्गत कुठेतरी अज्ञात स्थळी असल्याच्या चर्चा असताना या खासदारांचा बंडानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमुळे मात्र आणखी सस्पेन्स वाढला आहे.

6 बंडखोर खासदारांचा पहिला फोटो समोर…

एका वृत्तवाहिनीने हा फोटो समोर आणला आहे. या फोटोमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे 3 बंडखोर खासदार दिसत आहेत. ज्यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, मुंबईचे संजय दिना पाटील आणि वाशिमचे संजय देशमुख हे तिघे दिसत आहेत. मात्र यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे दिसत नाहीत. कारण त्यांनी आपण कुंटुंबासोबत पुण्यात आहेत. असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच आज त्यांचे वडिल दिवंगत पवनराजे निंबाळकर खून प्रकरणावर अंतिम निकाल येणार असल्याने ते आपल्या कुटुंबासोबत आहेत.

ठाकरेंसोबत असशील तर बापाचं पिंडदान करुन दाखव; अंधारेंचं आष्टीकरांच्या मुलाला आव्हान

या फोटोवरून हे खासदार नेमके कुठे आहेत? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर या फोटोमध्ये हे तीन खासदारांच्या शेजारी शिवसेनेचे समन्वयक अभिषेक वर्मा बसलेले आहेत. तर समोर कुणीतरी बडा नेता असावा कारण हे खासदार काही तरी चर्चा करताना दिसत आहेत. मात्र तो समोर बसलेला नेता कोण? याबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.

Exit mobile version