500 Crore Controversy : मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपये घेतले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही त्यांना पैसे दिले नसल्याचं सांगितलं आहे. मग, या संवादात असा उल्लेख नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली. संबंधित संवादाची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करण्याची मागणी आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी फॉरेन्सिक तपासणीची मागणी मान्य केली असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता तपासातून समोर येईल, असं सांगत आता सर्वांनी या विषयावर पडदा टाकला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
– बातमी अपडेट होत आहे
