मी गेले 10 ते 12 वर्षे मी तुमच्या सर्वांच्या (Shivsena) शिवसेनेचं नेतृत्व करत आहे. पण गद्दारांकडून जे काही माझ्यावर आता जे काही आरोप होताहेत, ते खरे आहेत का ते सांगा. मी आज पक्षप्रमुख पद सोडायला तयार असल्याचं विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. त्याचबरोबर त्यांनी यावेळी माझी सोन्यासारखी शिवसेना कोणत्या चोर किंवा गद्दारांच्या हाती जाता कामा नये. तुमच्यातला एखादा शिवसैनिक पक्षप्रमुख झाला तरी मला आनंदच होईल असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढ बोलताना ठाकरे म्हणाले, मी कोणाला भेटत नाही, आदित्य फिरत नाही. पण जर मी भेटत नव्हतो, तर गधड्या तू निवडून कसा आलास. प्रत्येक लोकसभेत सहा ते दहा सभा घेतल्या. तेव्हा निवडून आले. मी निवडून आणून तुला विधानसभेत पाठवलं,खुर्ची दाखवली, आमदार केलं, मंत्री केलं. हा माझा गर्व असेल, पण मी गर्व दाखवणार नसल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं.
आज शिवसेनेचा हिरकमहोत्सवी वर्धापन दिन साजरा झाला. उद्धव ठाकरे यांनी यामेळाव्यात भाजपा आणि त्यांच्या धोरणावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की ज्या पद्धतीने देशाचं राजकारण सुरू आहे. ते पाहिल्यावर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे. तुम्हाला नेमके किती आमदार खासदार हवेत असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. याचा उल्लेख करीत उद्धव ठाकरे म्हणाले की आता जे दिवस आलेले आहेत. डॉक्टर लोकं प्रश्नचिन्हांकित झालं आहे. आपण करतोय काय. एक कार्टुन आल होतं. एका सोने चोराला पोलिसांनी पकडलं. तो म्हणतो साहेब चोरी म्हणू नका. ऑपरेशन गोल्ड म्हणा, असं चालू असेल तर आपल्याला ऑपरेशन कमळ करावे लागेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले की हा लोकशाहीला धोका आहे. असंच सुरू राहिलं तर देश अराजकाकडे चालला आहे. मी भाकीत करत नाही. मी ज्योतिष नाही. ते दिसतंय. ज्या देशात तरुणाईला झुरळ म्हटलं जातं त्या देशाचं भविष्य काय असेल. वाटेल ते करून निवडणुका जिंकल्या जात आहे.
पलिकडून कुणाला अर्ज भरूच दिला जात नाही. एवढं करून कुठे जाणार आहे. काय करणार आहात देशाचं. नड्डा म्हणाले होते देशात एकच पार्टी राहिल. यांची वाटचाल नो वन पार्टी नो इलेक्शन. भाजप दोस्त होता. प्रेमळ सल्ला देतो. या वाटेनं जाल तर दीर्घकाळ सत्ता लाभणार नाही. तरुणांना झुरळ म्हणत असाल तर मुलं पेटली तर तुमचं सरकार राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
