नागरी कायदा लागू करण्याबद्दल हालचाली वाढल्या; गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा

Amit Shah On Uniform Civil Code : सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा सेतू’ अभियान राबवण्यात येणार आहे.

News Photo   2026 09 13T175453.655

Uniform Civil Code, Amit Shah, Amit Shah's Mumbai visit, Civil Code

Amit Shah On Uniform Civil Code : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (BRICS) देशभरात 1 महिना ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासोबतच विविध विकासकामे आणि सामाजिक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 13 सप्टेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत या अभियानाची घोषणा केली.

याच पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी समान नागरी कायद्याबाबतही मोठी घोषणा केली. देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकार काम करत असून, 2029 पर्यंत हा कायदा लागू केला जाईल, असं शाह यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं आगामी काळात समान नागरी कायद्याच्या मुद्यावर केंद्र सरकारकडून मोठी पावलं उचलली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

भारताकडून ब्रिक्स शिखर परिषदेचं दिमाखदार आयोजन; परिषदेतील ही खास छायाचित्रं खूप काही सांगून जातात

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत 12 कलमी कार्यक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये रक्तदान, आभार अभियान, नमो सेवा, संगीत आणि नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा तसेच ‘सेवा ज्योती कलश यात्रा’ यांचा समावेश आहे. यासोबतच वाडनगर ते वाराणसी आणि वाराणसी ते वाडनगर अशा यात्रांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा सेतू’ अभियान राबवण्यात येणार आहे. ब्लॉक आणि तालुका स्तरावर सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या या महिनाभराच्या अभियानातून केंद्र सरकारच्या कामांचा लेखाजोखाही जनतेसमोर मांडला जाणार आहे.

Exit mobile version