खासदार वाकचौरे यांच्या दोन वर्षाच्या कारकीर्दीचा फुसका बार…

Utkarsh Rupwate On Bhausaheb Wakchaure :  अहिल्यानगर राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर ची जोरदार चर्चा सुरू असून अहिल्यानगर

Utkarsh Rupwate On Bhausaheb Wakchaure

Utkarsh Rupwate On Bhausaheb Wakchaure

Utkarsh Rupwate On Bhausaheb Wakchaure :  अहिल्यानगर राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर ची जोरदार चर्चा सुरू असून अहिल्यानगर येथील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार अशी जोरदार चर्चा आहे मात्र मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करून त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यामध्ये खासदार वाघचौरे पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्ष रूपवते यांनी केला आहे.

रूपवते  यांनी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे (Bhausaheb Wakchaure) यांच्या गेल्या दोन वर्ष तील कारकीर्दीबाबत संवाद साधला असून जनतेची दिशाभूल करून त्या अपेक्षेने आणि विश्वासाने त्यांना निवडून दिले त्या अपेक्षाची पूर्तता करण्यात खासदार अपयशी ठरले आहे अशा शब्दात वाकचौरे यांच्या कामगिरीची पोलखोल केली.

दोन वर्षात काय काम झाली? 

लोकसभेच्या निकालाला पूर्णपणे दोन वर्षे पूर्ण झाली असून या काळामध्ये खासदार म्हणून मतदारसंघातील कोणती कामे वाकचौरे यांनी केली, त्याचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडणे अपेक्षित होते मात्र तसे काहीही घडलेले दिसत नाही आपल्या निवडणुकीच्या वेळेच्या जाहीरनामा दिलेले मोठमोठे आश्वासने त्यातील कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचा देखील यावेळी रुपवते (Utkarsh Rupwate) म्हणाल्या.

 सक्षम विरोधक नाही

देशात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवून त्यांची कोणतीही भूमिका दिसून येत नाही तसेच सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका देखील ते ठामपणे मांडत नसतात लोकसभेमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार अन्याय व दलितांचे प्रश्न कोणतेही ज्वलंत विषयावर खासदारांनी आवाज उठवला नसल्याचे देखील खंत यावेळी रूपवते यांनी व्यक्त केली.

… तर वैभव सूर्यवंशीवर येणार बंदी ; श्रीलंकेच्या खेळाडूशी झालेल्या वादानंतर ICC करणार कारवाई? जाणून घ्या नियम-

ऑपरेशन टायगर वाकचौरे यांची शिंदे सेनेकडे वाटचाल

राज्यात ऑपरेशन टायगर याची जोरदार चर्चा सुरू असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार अशा जोरदार चर्चा सुरू आहे यातच मातोश्री वरील दोन बैठकींना वाकचौरे यांनी उपस्थिती दर्शवली नाही यामुळे शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचे देखील संशयाची सुई वाकचौरे यांच्या भोवती फिरत आहे.

Exit mobile version