राज्यात हवामानाचा डबल गेम! एका बाजूला उकाडा, तर दुसरीकडे महाराष्ट्रासह 16 राज्यांत वादळी पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

Untitled Design   2026 10 18T124159.256

Untitled Design 2026 10 18T124159.256

Warning of thunderstorms and rain in 16 states, including Maharashtra : राज्यात एकीकडे उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असतानाच दुसरीकडे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज, 18 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18, 19 आणि 20 ऑक्टोबरदरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथे वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राम शिंदेंनी आकडा फोडला! जिल्हा बँकेसाठी कर्जत तालुक्यातील मतदार सहलीला नेल्याची घोषणा; रोहित पवारांची टीका

याशिवाय पुणे, सातारा, रायगड, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून, नागरिकांनी हवामानातील बदलांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्राच्या उर्वरित भागांतून तसेच गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागांतून माघार घेतली आहे. याशिवाय झारखंड आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांतूनही मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे.

मात्र, मान्सूनची माघार सुरू असतानाही देशातील काही भागांत हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतासह डोंगराळ प्रदेशातील अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज 18 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये तसेच प्रदेशांमध्ये पाऊस आणि वादळी हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्य सरकारचा खर्चावर अंकुश; सर्व विभागांना 20 टक्के निधी कपातीच्या सूचना, दुष्काळासाठी निधी वळवणार?

काही भागांत ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी पावसाच्या काळात झाडांखाली किंवा कमकुवत बांधकामांच्या आसपास थांबणे टाळावे आणि विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

Exit mobile version