पोलिस व्हॅनसमोर एकटीच आडवी आली अन् विद्यार्थ्यांना मिळवून दिला दिलासा; कोण आहे रिया अहीर?

व्हिडिओमध्ये एक तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर निर्धाराने उभी राहून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना सोडून देण्याची मागणी करताना दिसत आहे.

Untitled Design (79)

Untitled Design (79)

Who is Riya Ahir? : दिल्लीतील जंतर-मंतरप्रमाणेच मुंबईत देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. या आंदोलनादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर निर्धाराने उभी राहून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना सोडून देण्याची मागणी करताना दिसत आहे. तिच्या धाडसी भूमिकेमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

ही तरुणी म्हणजे 27 वर्षीय रिया अहिर. रिया अहिर या मॉडेल, अभिनेत्री आणि उद्योजिका असून सामाजिक तसेच सार्वजनिक प्रश्नांवर त्या नेहमीच स्पष्ट भूमिका मांडत असतात. फॅशन क्षेत्रात देखील त्यांची स्वतःची ओळख असून रियासत या नावाने त्यांचा कपड्यांचा ब्रँड आहे. अभिनय आणि मॉडेलिंगसोबतच त्यांना नृत्याची देखील आवड आहे. त्यांनी अनेक संगीत व्हिडिओंमध्ये काम केले असून त्यांचे दिलबरा हे गाणं 2025 मध्ये प्रदर्शित झाले होते.

रिया या धार्मिक स्वभावाच्या असून त्यांची देवावर गाढ श्रद्धा आहे. त्या नियमित मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करतात. मात्र सध्या त्यांची चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नव्हे, तर विद्यार्थी आंदोलनातील धाडसी भूमिकेमुळे होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिया दादरमधील कोहिनुर स्क्वेअर परिसरातून शिवाजी पार्ककडे जात होत्या. त्यावेळी त्यांनी पाहिले की, पोलिसांच्या एका व्हॅनमध्ये आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेले विद्यार्थी बसवण्यात आले होते. हे पाहताच त्या थेट व्हॅनसमोर जाऊन उभ्या राहिल्या आणि विद्यार्थ्यांना तात्काळ मुक्त करण्याची मागणी केली.

विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि केंद्र सरकारवर अण्णामलाईंची टीका; विद्यार्थ्यांचा विश्वास गमावणे देशासाठी धोकादायक

यावेळी पोलीस आणि रिया यांच्यात काही काळ वाद देखील झाला. पोलिसांनी विद्यार्थ्यांना पुढे जाऊन सोडण्यात येईल, असे सांगितले. मात्र रियाने सोडायचेच असेल तर आत्ताच सोडा अशी ठाम भूमिका घेतल. त्या बराच वेळ व्हॅनसमोर उभ्या राहिल्या. शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुक्त केल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रियाच्या धाडसाचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उभे राहून त्यांनी एकट्याने पोलिसांसमोर भूमिका घेतल्याने त्या आंदोलनाच्या चर्चेतील चेहरा ठरल्या आहेत. माध्यमांशी बोलताना रिया यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्न उपस्थित केले. जर प्रशासनाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही, तर नागरिक म्हणून आपल्यालाच पुढे येऊन आपल्या सहकार्यासाठी उभे राहावे लागेल, असे त्या म्हणाल्या .

तसेच मी कोणत्याही विशिष्ट समाजघटकातून आली नाही, माझे वडील शेतकरी देखील नाहीत. तरी देखील विद्यार्थ्यांना झालेली मारहाण चुकीची असल्याने त्यांच्या बाजूने आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मी कोणत्याही विशिष्ट समाजघटकातून आलेली नाही, माझे वडील शेतकरीही नाहीत. तरीही विद्यार्थ्यांवर झालेली मारहाण चुकीची असल्याने त्यांच्या बाजूने आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या समाज आणि संस्कृतीचा अभिमान असल्याचेही रियांनी यावेळी नमूद केले.

Exit mobile version