Download App

18 लॅटिट्यूड मॉलमध्ये बच्चे कंपनींची ‘धमाल मस्ती’; बुडूख ज्वेलर्स ‘फन कार्निवल’ची उत्साहात सांगता

सध्या शालेय विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये भटकंती, शॉपिंग आणि धमाल मस्तीचे नियोजन केले जात आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

पुणे : सध्या शालेय विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये भटकंती, शॉपिंग आणि धमाल मस्तीचे नियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पुनावळेतील 18 लॅटिट्यूट मॉलमध्ये (18 Latitude Mall ) ‘फन कार्निवल’ चे आयोजन करण्यात आले होते. यात बालचमूंनी आणि त्यांच्या पालकांनी धमाल मस्ती केली. चिंचवड येथील बुडूख ज्वेलर्सतर्फे याचे प्रायोजन करण्यात आले होते. (Budukh Jewellers 18 Latitude Mall Fun Carnival Punawale)

बजेट तयार ठेवा, टाटा करणार मोठा धमाका, लाँच होणार ‘ह्या’ 4 शानदार इलेक्ट्रिक SUV कार्स

बालचमूंसह पालक धमाल मस्तीत रंगले

18 लॅटिट्यूड मॉलमध्ये आयोजित ‘फन कार्निवल’ मध्ये बालचमूंसह त्यांच्या पालकांसाठी कॅप पेंटिंग, मार्बल मग पेंटिंगसह विविध आर्ट अ‍ॅक्टिव्हिटीजचे नियोजन करण्यात आले होते. याशिवाय पोटपूजेसाठी येथे कॉटन कॅंडी, पॉपकॉर्नसह विविध खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आडवा हात मारत आनंद घेतला.

‘फन कार्निवल’ मध्ये मजा करताना बच्चे कंपनी

कार्निवलमध्ये काय होते खास

बुडूख ज्वेलर्स आयोजित फन कार्निवलमध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद मिळावा यासाठी ऑर्केस्ट्रा, बलून स्प्रक्चरसह, नेल आर्ट अशा विविध गोष्टींचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय बालचमूंसाठी जादूचे खेळही सादर करण्यात आले होते ते बघून अनेकांना आचंबित केले.

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी, आपोआप क्लिअर होणार Unread मेसेज

‘लकी ड्रॉ’ ने कार्निवलची सांगता

दोन दिवसीय कार्निवलची सांगता ‘लकी ड्रॉ’ ने करण्यात आला यात समृद्धी वडेवाले आणि सिद्धी महामुनी या दोन भाग्यवान विजेत्यांना चिंचवड येथील बुडूख ज्वेलर्सच्या खास कलेक्शन मधून मोत्याची ज्वेलरी भेट देण्यात आली. 18 लॅटिट्यूड मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘फन कार्निवल’ला परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

‘फन कार्निवल’ मध्ये आयोजित जादूचे प्रयोग

यापूर्वीही अशा स्वरूपाच्या ‘फन कार्निवल’ चे आयोजन 6 आणि 7 एप्रिल 2024 रोजी पुनावळे येथील बालाजी मंदिराजवळील, 18 लॅटिट्यूड मॉल काटे वस्ती, पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा 18 आणि 19 मे रोजी याचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही कार्निवलला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भविष्यात 18 लॅटिट्यूड मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास कार्यक्रमाच्या आयोजक कांचन बुडूख यांनी व्यक्त केला. या कार्निवलसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकरण्यात आले नव्हते तसेच सर्व अॅक्टिव्हिटी मोफत होत्या असे कांचन बुडूख यांनी सांगितले.

follow us

वेब स्टोरीज