Download App

bird flu : चीनमध्ये नव्या व्हायरसचा कहर, 56 वर्षीय संक्रमित महिलेचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

कोरोनानंतर (Corona) आता चीनमध्ये एका नवीन व्हायरसने कहर करायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये H3N8 नावाच्या बर्ड फ्लूच्या (bird flu) व्हायरसमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण चीनच्या झोंगशान शहरातील 56 वर्षीय महिलेला H3N8 बर्ड फ्लूची लागण झाली होती, त्यामुळं सोमवारी तिचा मृत्यू झाला. H3N8 बर्ड फ्लू मुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, H3N8 एव्हीयन इन्फ्लूएंझा मुळे झालेला हा पहिला मानवी मृत्यू आहे. गेल्या वर्षी, मानवांमध्ये या संसर्गाची आणखी दोन प्रकरणे नोंदवली गेली होती.

महिला कॅन्सरसह अनेक आजारांनी ग्रस्त
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, गंभीर निमोनियामुळे या महिलेला रुग्णालयात उचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, नंतर तिचा मृत्यू झाला. त्या महिलेला मायलोमा (कर्करोग) सह अन्य आजाराच्या देखील काही समस्या होत्या.

जगभरात पार्किन्सन आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी 11 एप्रिल रोजी जागतिक पार्किन्सन दिन साजरा केला जातो

WHO ने आपल्या अपडेटमध्ये सांगिते की, ‘सिव्हियर एक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन (SARI) प्रणालीद्वारे या महिलेची तपासणी केली. त्यानंतर ह्या महिलेला H3N8 व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र, या महिलेच्या संपर्कात आलेल्या कोणालाही संसर्ग किंवा रोगाची लक्षणे आढळली नाहीत, ही दिलासादायक बाब आहे.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, ही महिला आजारी पडण्यापूर्वी या महिला प्राण्यांच्या बाजारात पोल्ट्री फॉर्मच्या संपर्कात आली होती. त्या बाजारातून गोळा केलेल्या नमुन्यात H3 एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणू आढळून आला, तर त्या महिलेच्या घरी घेतलेले नमुने निगेटिव्ह आले आहेत.

मानवांमध्ये या संसर्गाची तिसरी घटना आणि पहिला मृत्यू
H3N8 फ्लूचा व्हायरस हा सामान्यतः पक्ष्यांमध्ये आढळतो, परंतु तो घोड्यांमध्येही आढळून आला आहे. दरम्यान, चीनमध्ये नोंदवलेले नवीन प्रकरण हे मानवांमध्ये संसर्गाचे फक्त तिसरे प्रकरण आहे आणि प्रौढ व्यक्तीला संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण आहे. या व्हायरसमुळे पहिल्यांदाच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याला एशियाटीक फ्लु म्हणतात.

Tags

follow us