Download App

AADHAAR कार्डधारकांसाठी गुड न्यूज ; UIDAI ने केली ही मोठी घोषणा

Aadhaar Card Update : देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना (Aadhaar Card) सरकारने मोठा दिलासा दिला. UIDAI ने सांगितले आहे की, आता आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. UIDAI ने आधार अपडेट करण्याचं शुल्क रद्द केलं आहे. पण, याकरिता एक अट घालण्यात आली आहे. जर तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली, तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. तेच जर तुम्ही आधार कार्ड फिजिकल काऊंटरवर अपडेट केलं तर त्याकरिता मात्र आपल्याला 50 रुपये द्यावे लागणार आहेत.

केव्हा उपलब्ध होणार सुविधा?

UIDAI नं माहितीनुसार की, आधार धारकांना ३ महिन्यांसाठी या मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ घेता येणार आहे. आधार कार्ड धारक १५ मार्च २०२३ ते १४ जून २०२३ पर्यंत त्यांचं आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करु शकणार आहेत.

३१ मार्चपर्यंत पॅन, आधार लिंक करणं अनिवार्य

आधार-पॅन कार्ड लिंक (Aadhaar- Pan Card Link) करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. याबरोबरच, ज्यांनी १० वर्षांपासून आधारमध्ये कोणते देखील बदल केले नाहीत, त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे लागणार आहे, याकरिता UIDAI प्राधिकरण सतत माहिती देत आहे.

अपडेट करण्यासाठी नेमकं काय कराल ?

आधार कार्ड धारक त्यांच्या आधार क्रमांकाद्वारे https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करु शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाणार आहे. यानंतर तुम्हाला ‘कागदपत्र अपडेट’ वर क्लिक करावं लागणार आहे. तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्डचा तपशील दिसणार आहे. यानंतर तुम्हाला तुमची अपडेटेड माहिती भरावी लागणार अहेड.

Telegram App : टेलीग्रामचे युझर्ससाठी नवे फीचर्स, तुम्हीही वापरू शकता

ऑनलाईन पद्धतीने अपडेट करण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो

1. https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेत स्थळावर तुम्ही स्वत: अपडेट करु शकणार आहात. आधार स्वयं-सेवा (Self Service) अपडेट पोर्टलवर जा आणि ‘पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा’ (proceed to update address) पर्यायावर क्लिक करा.

2. आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि OTP वापरुन लॉग इन करावे लागणार आहे.

3. ‘proceed to update address ‘ वर क्लिक करा.

4. 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘OTP पाठवा’ वर क्लिक करा.

5. OTP एंटर करा आणि आधार खात्यात लॉगिन करा.

6. ‘update address via address proof’ पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता भरा.

7. ‘Proof of Address’ मध्ये नमूद केलेला निवासी पत्ता भरा.

8. आता, अॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट बटणावर क्लिक करा.

9. पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

Tags

follow us