Download App

PSIव्हायचयं! MPSC तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी निघाली भरती, ‘या’ तारखेपूर्वी करता येईल अर्ज….

  • Written By: Last Updated:

PSI Vacancy: अंगावर खाकी वर्दी असावी, यासाठी आज लाखो तरुण हे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. अनेकांना पोलिस होऊन तो मान मिळवावा असं वाटतं. महाराष्ट्रात तर पीएसआय (Police Sub Inspector) पद मिळण्याठी मोठी स्पर्धा असते. दरम्यान, तुम्हाला पीएसआय व्हायची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण 615 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एमपीएससीने पोलीस उपनिरीक्षक पद भरती संदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन संकेतस्थळावर प्रकाशित केले आहे. ही पीएसआयची परीक्षा मुंबईसह महाराष्ट्रातील सात जिल्हा केंद्रांवर प्राथमिक परीक्षा घेण्यात येणार आहे. पीएसआय पदासाठी विद्यार्थी ११ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करू शकतात.

PSI ची प्राथमिक परीक्षा 2 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अनेक वर्षांनंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ६१५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Manipur Violence : हिंसेमध्ये आणखी दोघांचा मृत्यू , परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांकडून गोळीबार 

या पदभरतीसाठी विद्यार्थी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. पीएसआय पदासाठी अमागास उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे तर मागासवर्गीय उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० राहणार आहे. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणीनंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. एमपीएसनी प्रकाशित केलेली ६१५ जागांसाठीची ही जाहिरात उमदेवारांना आयोगाच्या अधिकृत वेबसाईटर पाहता येईल.

या पद भरतीची अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते. PSI पदासाठी कमाल वयोमर्यादा OBC उमेदवारासाठी 35 वर्षे आणि OBC उमेदवारासाठी 40 वर्षे असेल. विद्यार्थ्यांची अंतिम निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणीनंतर केली जाईल. 615 पदांसाठी ही जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, सविस्तर माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर भेट द्यावी.

Tags

follow us