Download App

AIIMS मध्ये नर्सिंग ऑफीरस पदांसाठी भरती, 25 ऑगस्टपासून करू शकता अर्ज

  • Written By: Last Updated:

All India Institute of Medical Science Recruitment : देशभरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (AIIMS) नोकरी मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेत नोकरी (Job) मिळणे हे अत्यंत अवघड काम आहे. दरम्यान, जर तुम्ही बेरोजगार असाल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर आहे. आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर Nursing Officer) पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून त्यात या भरतीची अंतिम तारीख, अर्ज फी, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण आदींची तपशीलवार माहिती दिली आहे. (AIIMS Recruitment for Nursing Officer Posts Apply from 25th August)

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळख पत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जासोबत जोडावा लागेल. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा. कारण, अर्जात काही त्रुटी आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल, याची नोंद घ्यावी.

पदाचे नाव – नर्सिंग ऑफिसर

एकूण रिक्त जागा – माहिती अद्याप उपलब्ध नाही.

शैक्षणिक पात्रता –
B.Sc (ऑनर्स) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) + नर्सिंग कौन्सिल नोंदणी किंवा GNM + नर्सिंग कौन्सिल नोंदणी + किमान 50 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये 2 वर्षांचा अनुभव.

डॉक्टरांची गैरहजेरी गर्भवतीच्या जीवावर बेतली; वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

वयोमर्यादा-
खुला प्रवर्ग – 18 ते 30 वर्षे.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी – रु.3000.
मागासवर्गीय/EWS – रु.2400.
PWD – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत वेबसाइट – https://www.aiims.edu/index.php?lang=en
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1AmIFHeTGCA88GanQOiJIV5sh2MwD0Itr/view

Tags

follow us

वेब स्टोरीज