Apple Event 2023 : अॅपल कंपनीने मंगळवारी आपल्या वार्षिक इव्हेंटमध्ये अनेक नव्या प्रॉडक्टची घोषणा केली. यामध्ये बहुप्रतिक्षीत iPhone 15 या सिरीजमधील चार फोन लाँच करण्यात आले. मात्र या इव्हेंटमध्ये केवळ आयफोनच नाही तर अनेक गॅझेट्सही लाँच करण्यात आले आहेत.
अॅपल इव्हेंटमध्ये लॉन्च झाले ‘हे’ गॅझेट्स…
सुरूवातीला पाहुयात बहुप्रतिक्षीत iPhone 15 या सिरीजमधील चार फोन लाँच करण्यात आले. त्यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max असे चार फोन लाँच केले आहेत. यामध्ये काही खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या सिरीजमधील फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही 15 सप्टेंबरपासून प्री बुकिंग करू शकता, अशी माहिती मिळाली आहे. हे फोन येत्या 22 सप्टेंबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील.
Home Loan : बँकांना दणका, कर्जदारांना दिलासा : कागदपत्रांबाबत RBI चा मोठा निर्णय
त्याचबरोबर एक महत्त्वाची घोषणा यावेळी कंपनीने केली. ती म्हणजे आयफोन 15 च्या सिरीज मधील फोन हे कोणत्याही अॅंन्ड्रॉईड फोनच्या ‘टाईप सी’ चार्जरने चार्ज करता येणार आहेत. तसेत कंपनीने त्यांच्या एअरपॉड्स प्रो (सेकेंड जनरेशन) साठी युएसबी-सी ला सपोर्ट करणारी चार्जिंग केसही लॉंच केली. त्याचबरोबर ज्यांच्याकडे लाईटनिंग चार्जर आणि चार्जिंग केबल आहे. त्यांच्यासाठी यूएसबी-सी टू लाईटनिंग अडॅप्टरही लॉंच केलं आहे.
Here is everything Apple announced today at the #AppleEvent
Apple Watch Series 9
Apple Watch Ultra 2
iPhone 15 and iPhone 15 Plus
iPhone 15 Pro and iPhone 15 Pro MaxWill you be buying any new products? pic.twitter.com/6Ol2Hr9giq
— Apple Hub (@theapplehub) September 12, 2023
तसेच अॅपलने स्मार्ट वॉच सीरिजची देखील घोषणा केली. त्यात त्यांनी अॅपल वॉच सीरिज 9 आणि अॅपल वॉच अल्ट्रा 2 चा समावेश आहे. यामध्ये S9 चिप वापरली असून दोन्ही वॉचमध्ये विविध अपडेट्स आणि नवील फिचर्स आहेत. त्यात खास म्हणजे या दोन्ही घडाळ्यांमध्ये डबल टॅप हे स्मार्ट जेस्चर आहे. त्यामुळे एका हाताचा वापर करून म्हणजे ज्या हातात वॉच घातलं आहे. त्या हाताच्या पहिल्या बोटाने अंगठ्यावर डबल टॅप केल्याने तुम्ही वॉचला कंमांड देऊ शकणार आहात.
अखेर शरद पवारांना पुण्यासाठी जिल्हाध्यक्ष मिळाला; अडचणीच्या काळात जुन्या सहकाऱ्यावर ‘विश्वास’
त्याचबरोबर I Cloud+ ची देखील घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता आयफोन युझर्स 6TB आणि 12TB स्टोरेज ऑप्शनसोबत अधिक फाईल्स आणि डेटा सेव्ह करता येणार आहे.