Apple Watch Series : नवीन हेल्थ अपडेटसह ॲपल स्मार्टवॉच लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Apple Watch Series 12 : ॲपलने iPhone Duo, iPhone 18 Pro Max आणि iPhone 18 Pro लॉन्च केले आहे. यासह या कार्यक्रमात ॲपलने नवीन

Apple Watch Series

Apple Watch Series

Apple Watch Series 12 : ॲपलने iPhone Duo, iPhone 18 Pro Max आणि iPhone 18 Pro लॉन्च केले आहे. यासह या कार्यक्रमात ॲपलने नवीन Apple Watch Series 12 देखील लॉन्च केले आहे. या वॉचमध्ये ॲपलने कंपनीने डिझायनपेक्षा फिटनेस फिचर्सवर जास्त भर दिला आहे. नवीन वॉच ‘ऑल-न्यू हेल्थ-सेन्सिंग सिस्टम’ देण्यात आली आहे, जी रक्तदाबातील बदल, झोप, स्लीप ॲप्निया आणि शरीराच्या महत्त्वाच्या लक्षणांचा रिव्हू देते. याचबरोबर वॉचमध्ये S11 SiP प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून ते ‘ऑन-डिव्हाइस ॲपल इंटेलिजन्स’ला सपोर्ट करते. भारतात याची सुरुवातीची किंमत 56,900 पासून सुरु होते.

तर दुसरीकडे कंपनीने या वॉचमध्ये आरोग्य निरीक्षण सिस्टिम पूर्णपणे बदलेली आहे. यात नवीन ऑप्टिकल आणि बायो-सेन्सर्सचा समावेश आहे, जे शरीराचे तापमान, रक्तदाबातील बदल आणि रात्रीच्या वेळी श्वास घेण्याच्या पद्धतींमधील बदलांवर लक्ष ठेवतात. तसेच नवीन वॉच कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया किंवा टोचण्याची प्रक्रिया न करता (Non-Invasively) रक्तदाबातील बदलांचा रिव्हू घेण्याची क्षमता देते. यात स्लीप ॲप्निया ओळखण्यासाठी एक प्रगत सिस्टिम देखील आहे. रात्रीच्या वेळी श्वास घेण्याच्या पद्धतींमधील बदलांची नोंद करून, हे फीचर्स संभाव्य समस्यांकडे लक्ष वेधू शकते.

ॲपल इंटेलिजन्सद्वारे आरोग्य अहवाल

आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण करण्यासाठी ॲपल वॉच सिरीज 12 ‘ऑन-डिव्हाइस ॲपल इंटेलिजन्स’चा वापर करते. तसेच वॉचने गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून, यूजर्स आरोग्याविषयी साप्ताहिक माहिती (insights) प्राप्त करू शकतो. यात डॉक्टरांशी शेअर करता येण्याजोगे PDF अहवाल तयार करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. नवीन वॉच जायरोस्कोप आणि ॲक्सिलरोमीटर सेन्सर्सनी सुसज्ज आहे. यामुळे मागील मॉडेल्सच्या तुलनेत वर्कआउटचा अधिक अचूक रिव्हू देते. मशीन-लर्निंग अल्गोरिदमद्वारे ‘स्टेप ट्रॅकिंग’ (पावले मोजण्याची क्षमता) देखील सुधारण्यात आली आहे. ॲपलचा दावा आहे की, कोणत्याही स्मार्टवॉचमध्ये आढळणाऱ्या स्टेप ट्रॅकिंगपेक्षा हे सर्वात अचूक आहे.

डिस्प्ले फीचर्स

ॲपल वॉच सिरीज 12 मध्ये अधिक पातळ बेझल्ससह ‘ऑलवेज-ऑन रेटिना OLED’ स्क्रीन देण्यात आली आहे. याचा डिस्प्ले कडांपर्यंत (edges) पसरलेला आहे आणि याची कमाल ब्राइटनेस (peak brightness) 2000 निट्सपर्यंत आहे, ज्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशातही स्क्रीनवरील कंटेंट स्पष्टपणे दिसतो.

बॅटरी आणि चार्जिंग

ॲपल वॉच सिरीज 12  (Apple Watch Series 12) एकदा चार्ज केल्यावर 24 तासांपर्यंतचा बॅकअप देते. यात फास्ट चार्जिंगची सुविधाही आहे. केवळ 15 मिनिटे चार्ज केल्यावर 18 तासांहून अधिक बॅटरी लाइफ मिळू शकते. नवीन मॅग्नेटिक फास्ट-चार्जिंग डॉकमुळे हे शक्य झाले असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

मनोज जरांगे माझे भाऊ, त्यांना घरी जेवायला निमंत्रण देते-

भारतातील किंमत

भारतात ॲपल वॉच सिरीज 12 च्या ॲल्युमिनियम व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 56,900  आहे. टायटॅनियम मॉडेलची किंमत 99,900 आहे, तर सिरॅमिक मॉडेलची किंमत 1,24,900 आहे. ॲपल वॉच सिरीज 12 साठी प्री-ऑर्डर आधीच सुरू झाल्या आहेत. कंपनीची स्टोअर्स आणि अधिकृत विक्रेत्यांमार्फत याची अधिकृत विक्री 18 सप्टेंबर 2026 रोजी सुरू होईल.

Exit mobile version