Apple’s iPhone 18 Pro to launch Soon find out price, features, and everything : सप्टेंबर महिना आला की, स्मार्ट फोन अन् त्यातही अॅप्पलच्या iPhone ची क्रेझ असणारे लोक वाट पाहत असतात ती अॅप्पलच्या iPhoneची नवी सिरीज कधी लॉन्च होणार? त्याची खासियत काय असणार? याची. मात्र आता ही उत्सुकता संपली आहे. कारण आता अॅप्पलच्या iPhone 18 Pro ची लॉन्चिंगची तारीख, किंमत अन् फिचर्स याची सविस्तर माहिती समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर…
महिन्याला 4 लाख पगार, अडीच लाखांची बचत, तरीही मूल नको; होम लोन कपल्सच्या आनंदावर विरजण?
अॅप्पलचा पुढील मोठा इव्हेंट लवकरच होणार आहे. कंपनी 9 सप्टेंबर रोजी ‘सरप्राईच अॅन्ड शाईन’ नावाने विशेष कार्यक्रम आयोजित करणार असून, यामध्ये iPhone 18 Pro सीरिज आणि बहुचर्चित iPhone Fold सादर होण्याची शक्यता आहे. iPhone 18 Pro मध्ये काही मोठे अपग्रेड्स मिळण्याची चर्चा असतानाच, जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या मेमरीच्या तुटवड्यामुळे Apple ला RAM साठी मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे समोर आले आहे.
RAM च्या किमतीत तब्बल 400 टक्क्यांनी वाढ?
ट्रेंन्ड फोर्सच्या एका नव्या मार्केट रिपोर्टनुसार, iPhone 17 Pro च्या तुलनेत अॅप्पलला iPhone 18 Pro साठी RAM वर मोठा खर्च करावा लागू शकतो. अहवालानुसार, 256GB Pro मॉडेलसाठी 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत मेमरीचा खर्च मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 400 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
iPhone 18 Pro ची किंमत वाढण्याची शक्यता
AI डेटा सेंटर्सची वाढती मागणी सध्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी मोठे आव्हान ठरत आहे. RAM आणि NAND मेमरीची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने त्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे इतर घटकांवरील खर्च कमी करण्याचे प्रयत्न करूनही अॅप्पलला iPhone 18 Pro मॉडेल्सच्या किमती वाढवाव्या लागू शकतात.
विद्यानंद बापटांनाच पुणेकरांनी डीजेवर नाचवलं; एआय व्हिडीओ व्हायरल
अहवालानुसार, इतर घटकांसाठी कमी दरात करार करण्याचे अॅप्पलचे प्रयत्न सुरू असले तरी त्यामुळे एकूण उत्पादन खर्चावरील दबाव पूर्णपणे कमी होणार नाही. हार्डवेअरचा खर्च वाढत असल्याने उत्पादनांच्या किरकोळ किमती वाढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अॅप्पलने यापूर्वी भारतासह जागतिक बाजारपेठेत मॅकबुक आणि आयपॅड सारख्या काही उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र, आतापर्यंत iPhone च्या किमतीत मोठी वाढ करण्यात आलेली नाही.
iPhone 18 Pro किती महाग होऊ शकतो?
अॅप्पलसंपूर्ण वाढलेला खर्च ग्राहकांवर टाकेल, अशी शक्यता कमी आहे. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार अमेरिकेत iPhone 17 Pro च्या तुलनेत iPhone 18 Pro ची किंमत सुमारे 100 डॉलर म्हणजेच अंदाजे 9,500 रुपयांनी वाढू शकते.ट्रेंन्ड फोर्सच्या अंदाजानुसार, iPhone 18 Pro ची किंमत 1,249 ते 1,299 डॉलर, म्हणजेच अंदाजे 1.18 लाख ते 1.22 लाख रुपये असू शकते. तुलनेत iPhone 17 Pro ची किंमत 1,099 डॉलरच्या आसपास होती.
iPhone 18 Pro Max च्याही किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याच्या संभाव्य किंमतीबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. भारतीय बाजारातही किमतीत अशीच वाढ होऊ शकते. सध्या भारतात iPhone 17 Pro ची किंमत 1,34,900 रुपये, तर iPhone 17 Pro Max ची किंमत 1,49,900 रुपये आहे.
Foldable iPhoneची किंमत जवळपास 2 लाख?
रिपोर्टनुसार, अॅप्पलचा पहिला फोल्डेबल iPhone अमेरिकेत 2,099 ते 2,299 डॉलर, म्हणजेच साधारण 1.98 लाख ते 2.17 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च होऊ शकतो. नव्या iPhone मॉडेल्सची नेमकी किंमत आणि फीचर्स जाणून घेण्यासाठी आता 9 सप्टेंबरच्या अॅप्पलइव्हेंटची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा ‘सरप्राईच अॅन्ड शाईन’ कार्यक्रम अॅप्पलच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत यु्ट्युब चॅनेलवर भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजल्यापासून थेट पाहता येईल.
