Download App

बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती, ‘या’ पदांसाठी भरती सुरू

  • Written By: Last Updated:

Bank of Maharashtra Recruitment 2023 : गेल्या काही दिवसांपासून सरकारी क्षेत्रात तसेच खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. त्यामुळं बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. बॅंकिंग क्षेत्रातही रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. दरम्यान, तुम्हीही बॅंकेत नोकरीची संधी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.

Nitesh Rane : सदावर्तेंची गाडी फोडणारे काल मातोश्रीवर होते; राणेंचा गंभीर आरोप 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

पदाचे नाव– क्रेडिट ऑफिसर स्केल-II, क्रेडिट ऑफिसर स्केल-III

एकूण रिक्त पदे– 100

शैक्षणिक पात्रता –
क्रेडिट ऑफिसर स्केल – II: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/वित्त/बँकिंग आणि वित्त/मार्केटिंग/फॉरेक्स/क्रेडिट मधील MBA किंवा PGDBA/PGDBM/CA/CFA/ICWA + 3 वर्षांचा अनुभव.

क्रेडिट ऑफिसर स्केल – III: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/वित्त/बँकिंग आणि वित्त/मार्केटिंग/फॉरेक्स/क्रेडिट मधील MBA किंवा PGDBA/PGDBM/CA/CFA/ICWA + 5 वर्षांचा अनुभव.

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात पहा.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज फी –
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस- रु 1180.
मागासवर्गीय- 118 रु.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात – 23 ऑक्टोबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2023
अधिकृत बँक वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/193G7i9ZaQOZWUsJgwFJdtfH5nZdWq7N0/view

 

Tags

follow us