National Lipstick Day : आज राष्ट्रीय लिपस्टिक दिवस आहे. आजच्या असो वा जुन्या सौंदर्यामध्ये ओठांना आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये लिपस्टिकला एक वेगळच महत्त्वाचं असं स्थान आहे. आज तर लिपस्टिक वापरत नाही अशी महिला किंवा मुलगी शोधणे कठीण आहे. कारण रोजच्या दैनंदिन आयुष्यात देखील लिपस्टिक तेवढ्याच आवडीने वापरली जाते. ( Before 5 thousand years ago Lipstick made from precious gems National Lipstick Day )
Ahmednagar-Pune इंटरसिटी रेल्वे होणार? खासदार विखेंचं मोठं विधान
त्यामुळे जगातील विविध ब्रॅंड विविध प्रकार आणि शेड्सच्या लिपस्टिक्सने आपल्या महिला ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. काऱण आता फक्त चित्रपट अभिनेत्रीच नाही तर सामन्य महिला देखील तितक्याच आवडीने लिपस्टीक वापरतात. यामध्ये एका रंगाचे इतके शेड्स पाहून तर पुरूष मंडळी आवाक् होतात.
‘व्हॉट्सअॅपवर पाठवू शकत नाही तू आल्यावर दाखवतो’; कुरुलकरच्या चॅटमधून धक्कादायक खुलासे
त्यामुळे आजच्या निमित्ताने जाणून घेऊ लिपस्टीकची सुरूवात कशी झाली? एका वेबसाईटच्या माहितीनुसार 5 हजार वर्षांपूर्वी ‘सुमेरियन’ स्त्री-पुरूष लिपस्टीक वापरत. त्या लिपस्टीक मौल्यावान रत्नांपासून बनवल्या जायच्या. तर इजिप्तमध्ये ‘किल्योपेट्रा’ चक्क किडे मारून ओठांना लाल रंगाने सजवल जायचं. तर ‘इंडस व्हॅली सिव्हिलायझेन’मधील महिला गेरूने आपले ओठ रंगवत. तर त्य काळात केवळ श्रीमंत महिलाच लिपस्टीकचा वापर करत
अरब शास्त्रज्ञाने बनवली पहिली लिपस्टीक
इजिप्तमध्ये महिलांनी लिपस्टीक लावणे हे ओरल सेक्सचा संकेत मानला जात होता. त्याकाळात सेक्सवर्कर त्यांच्या पार्टनरला आकर्षित करण्यासाठी लिपस्टीक लावत. तर 19 व्या शतकात फ्रान्सच्या कॉस्मेटीक कंपनी गुएरलेनने लिपस्टीक बनवायाला सुरूवात केली. पहिल्या व्यावसायिक लिपस्टीकचा शोध 1884 मध्ये हा शोध फ्रान्सच्या पॅरिमध्ये अत्तर निर्मिती करणाऱ्यांनी लावला. अरब शास्त्रज्ञ अबुलकोसिस यांनी 9 व्या शतकात लिपस्टीकचा शोध लावाला. तर सर्वात जास्त काल टिकणारी लिपस्टीक 1950 मध्ये बनवण्यात आली.