Bikini wax करताय? त्या आधी ‘हा’ सल्ला वाचा…

पुणे : सौंदर्य आणि स्त्रिया हे समीकरण कालातीत आहे. असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. त्यामध्ये आजच्या घडीला ब्युटी पार्लरशिवाय कोणता सण-समारंभ असो किंवा दैनंदिन जीवनाचे पान ही हालू शकत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीचे फायदे तसे तोटे देखील असतात. त्यामुळे पार्लर किंवा घरी देखील व्हॅक्सिंग करताना काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये विशेषतः बिकीनी व्हॅक्स करताना […]

Untitled Design   2023 02 09T170035.223

Untitled Design 2023 02 09T170035.223

पुणे : सौंदर्य आणि स्त्रिया हे समीकरण कालातीत आहे. असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. त्यामध्ये आजच्या घडीला ब्युटी पार्लरशिवाय कोणता सण-समारंभ असो किंवा दैनंदिन जीवनाचे पान ही हालू शकत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीचे फायदे तसे तोटे देखील असतात. त्यामुळे पार्लर किंवा घरी देखील व्हॅक्सिंग करताना काळजी घेणे गरजेचे असते.

यामध्ये विशेषतः बिकीनी व्हॅक्स करताना तुमच्या त्वचेच्या आरोग्याला हानीकारक ठरू शकतो. सर्वात आधी बिकिनी व्हॅक्स म्हणजे नक्की काय ? हे माहीत नसलेल्या लोकांसाठी हा काय प्रकार आहे हे समजावून सांगूया. तर मंडळी योनीमार्गाच्या आसपास असलेला एक न एक केस व्हॅक्सिंग करून काढून टाकणे जेणेकरून बिकिनी घातली तरी काहीही दिसू नये हा बिकिनी व्हॅक्सचा उद्देश असतो. हा भाग अतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्याने साहजिकच ही प्रक्रिया करून घेणे चांगलेच वेदनादायक असते. तरीही बऱ्याच तरुण मुली आणि काही वयाने मोठ्या स्त्रियाही हे नियमित करून घेतात.

यामागे काय कारण असावे ?
बऱ्याच जणी हे पुरुषांना आवडते म्हणून करत असाव्यात. प्रथमदर्शनी विचार करताना खरं तर असं वाटतं की, अजिबात केस नसलेला बाल्यावस्थेत असल्यासारखा दिसणारा योनीमार्ग पुरुषांना का आवडत असेल ? मग जरा खोलवर जाऊन विचार केला तर हल्लीच्या तरुण पिढीवर पोर्नोग्राफीचा असलेला प्रभाव हे कारण असू शकेल असं वाटतं. या फिल्म्समध्ये दाखवत असलेली पूर्णतः केसविरहित शरीरे आणि अवास्तव चित्रण तरुण पिढीची दिशाभूल करत असावी का अशी शंका येते ? आजच्या वयात येणाऱ्या आणि तरुण पिढीला पोर्नोग्राफी बघणे फारच सोपे झाले आहे. पण त्याचे त्यांच्या लैंगिक जीवनावर होणारे दुष्परिणाम त्यांना कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे.

आता जरा शास्त्रीय दृष्टिकोनातून या विषयाकडे बघूया. स्त्रियांच्या योनिमार्गाच्या भागात असलेले केस योनिमार्गाचे संरक्षण करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या जिवाणूंचे वास्तव्य या भागात आणि योनीमार्गाच्या आतही असते.या जिवाणूंमुळे योनीमार्गाची प्रतिकार शक्ती टिकून राहते आणि वेगवेगळ्या संसर्गाचा जास्त चांगला प्रतिकार होऊ शकतो.

हे सगळे केस जेव्हा शेव्हिंग किंवा व्हॅक्सिंग करून काढले जातात. तेव्हा या केसांचीमुळं उघडी पडतात, दुखावली जातात. त्यामुळे केसांच्या मुळात वेगवेगळे जंतुसंसर्ग होऊ शकतात. योनीमार्ग पूर्ण उघडा पडल्याने जास्त कोरडेपणा येऊ शकतो. परिणामी त्या भागात बाहेर आणि आतल्या बाजूलाही जंतुसंसर्ग होऊ शकतात. कोरडा पडलेल्या योनिमार्गात प्रतिकार शक्ती कमी होते. तसेच खाज सुटू शकते. ह्या एवढ्या सगळ्या समस्या सगळे केस मुळासकट काढण्याच्या अट्टाहासामुळे होऊ शकतात. मोठी इजा झाली तर हा प्रकार अजूनच धोकादायक ठरतो.

मात्र हा धोका नेमका काय आहे. हे जाणून घेण्यासाठी आम्ही स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, पुणे. यांच्या एका लेखाचा आधार घेतला आहे. याच लेखामध्ये त्यांनी त्यांच्याकडे आलेली बिकीनी व्हॅक्सची केसही सांगितली. त्या काय सांगतात ? पाहूयात….

‘काही दिवसांपूर्वी एक तरुण सुंदर मुलगी भेदरलेल्या अवस्थेत घाईघाईत क्लिनिकमध्ये आली. वेदनेने पिळवटलेला तिचा चेहरा बघून रिसेप्शनिस्टने लगेच तिला आत पाठवले. ‘मॅम माझं लग्न आहे म्हणून बिकिनी वॅक्स करायला गेले होते तर ते करताना त्या भागात मोठी जखम झाली आणि खूप ब्लिडींग सुरू झालं आहे. मला खूप भीती वाटतेय मॅम.’ असं म्हणत तिने रडायलाच सुरुवात केली.

तिला धीर देऊन शांत करून तपासले तर योनीमार्गाच्या अतिशय नाजूक भागात चांगला मोठा कट गेला होता. चक्क!!!नशिबाने साधे उपचार करून टाका घ्यावा न लागता ब्लिडिंग थांबलं आणि मग जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून औषधे देऊन तिची रवानगी केली. पण त्याआधी तिचं बौद्धिक घेतलंच मी.

पूर्वी आम्ही स्त्रीरोग तज्ञ कोणतीही शस्त्रक्रिया करायच्या आधी योनिमार्गाच्या भागातले सगळे केस काढायला सांगायचो पण यामुळे नंतर जंतुसंसर्ग वाढू शकतो असं लक्षात आल्यावर आता गरज असेल तेवढेच केस काढले जातात. अजून एक मुद्दा, योनिमार्गाच्या भागातले केस समूळ काढण्यापेक्षा कात्रीने काळजीपूर्वक कमी करणे हे सर्वात योग्य आहे. त्यामुळे स्वच्छ्ता पण राखली जाते आणि बाकी त्रास होत नाही. या भागात अजिबात स्वच्छता न करणेही चुकीचे आहेच. त्यामुळे अजून वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. गृमिंग करावेच पण त्यात सुरक्षितता असावी.

तर त्या दिवशी क्लिनिकमध्ये आलेल्या सुंदर युवतीचे असे बौद्धिक घेतल्यावर परत या वाटेला जाणार नाही आणि मैत्रिणींनाही सांगेन !’ असं आश्वासन देऊन ती शांत मनाने घरी गेली. तर मैत्रिणींनो सौंदर्याच्या काहीतरी विचित्र कल्पना मनाशी पक्क्या धरून उगाच स्वतः च्या शरीराचे असे हाल हाल का करून घ्यायचे ?

Exit mobile version