Download App

11 हजारात बुक करा मारुतीची ‘ही’ नवी गाडी

नवी दिल्ली : ऑटो एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी मारुतीने ऑफ रोडर एसयूव्ही जिमनी ही गाडी लॉन्च केली आहे. जिमनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून आहे. तर भारतात गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये दिसली आहे. आता अखेर 2023 मध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आली आहे. भारतात मारुतीची 4 व्हील ड्राइव्ह ऑफ रोडर एसयूव्ही जिमनी 5 डोअर व्हर्जन लॉन्च करण्यात आली आहे.

मारुतीने जिमनीची बुकिंगही सुरू केली आहे. कंपनी हीची विक्री प्रीमियम डीलरशिप नेक्साच्या माध्यमातून करणार आहे. कस्टमर 11 हजार रुपये देऊन हीची बुकिंग करू शकतात. मारुतीने सांगितले की, ही गाडी येत्या तीन महिन्यात रस्त्यावर दिसणार आहे.

या कारमध्ये 1.5-लिटर, 4-सिलेंडर K-15-B पेट्रोल इंजिन असेल. ती 6,000 RPM वर 101 BHP पॉवर आणि 4,000 RPM वर 130 NM टॉर्क जनरेट करेल. कारला 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल. SUV ला वॉशर आणि अत्याधुनिक मनोरंजन प्रणालीसह ऑटो एलईडी हेडलॅम्प देखील मिळतील. जिमनी सात रंगात लॉन्च करण्यात आली आहे.

मारुतीने जिमनी सोबत प्रीमियम SUV Franks देखील लॉन्च केली आहे. तरुणाईला लक्षात घेऊन, स्पोर्टी लूकमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह लॉन्च करण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, फ्रॉक्सच्या वैशिष्ट्यांमुळे ते जीवनशैली ग्राहकांसाठी आदर्श आहे. ही कार Nexa डीलरशिपवर उपलब्ध असेल. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. जिमनी प्रमाणेच ते 11,000 रुपयांना बुक केले जाऊ शकते.

तर दुसरीकडे एक्स्पोच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला, MG ने हायड्रोजन इंधनावर चालणारी कार Unique-7 (Euniq 7) लाँच केली. या कारमध्ये P390 फ्युएल सेल देण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्या 6.4-लिटर टाकीमध्ये इंधन भरण्यास फक्त तीन मिनिटे लागतील. त्याच वेळी, पूर्ण टाकीसह त्याची श्रेणी 605 किमी असल्याचे सांगितले जाते. स्वच्छ मोबिलिटीसाठी कंपनीने याचे वर्णन केले आहे.

Tags

follow us