Download App

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून पडझड होत आहे. यामुळे गुंतवणुकदार देखील चिंतेत होते. आंतराराष्ट्रीय बाजारातील परिस्थीती देखील काहीशी खालवल्याने मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळाली होती. मात्र आज शुक्रवारी शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आहे. आज बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्स व निफ्टी दोन्हीही तेजीत पाहायला मिळाले आहे.

आज सकाळी शेअर बाजारामध्ये व्यवहार सुरु होताच बीएसईचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स 530 अंकांच्या वाढीसह 58,160 वर पोहोचला. तर एनएसईचा (NSE) निर्देशांक निफ्टी 135 अंकांच्या वाढीसह 17,130 वर पोहचला. दरम्यान दिवसाच्या शेवटाला बाजारातील परिस्थीती काय राहते हे देखील पाहणे महत्वाचे राहणार आहे.

हे शेअर्स तेजीत
आज आपण पाहिले तर शेअर बाजारात आयटी, बँकिंग सेक्टरचे शेअर्स तेजीत आहेत. इन्फोसिसचे शेअर्स 1.6 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. आज बाजारात इन्फोसिस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, अल्ट्रा सिमेंट, एचसीएल टेक, एल अँड टी, एचडीएफसी बँक, कोटक बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, पावरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, रिलायन्स, नेस्ले इंडिया, मारुती हे शेअर्स तेजीत आहेत.

IND vs AUS: आज रंगणार पहिला एकदिवसीय सामना

‘या’ शेअर्समध्ये घसरण
आज सनफार्मा (Sunpharma), टीसीएस (TCS), आयटीसी (ITC), भारती एअरटेल या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. दरम्यान गुरुवारी भारतीय रुपया हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 25 पैशांनी मजबूत झाला होता. आज रुपया 82.73 वरुन 82.49 प्रति डॉलरवर घसरला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अत्यंत महत्वाची बातमी…

ग्लोबल मार्केटमधील परिस्थीती
सिंगापूरमध्ये, NSE निफ्टी फ्युचर्स SGX निफ्टी सकाळच्या सुमारास सुमारे 122.50 अंकांनी म्हणजे 0.72 टक्क्यांनी तेजीत होता. यामुळे देशांतर्गत शेअर बाजारातील व्यापाराची आज जोरदार सुरुवात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती.

Tags

follow us