Maruti Suzuki Discount Offers : ऑगस्ट महिन्यात तुम्ही तुमच्यासाठी नवीन कार (New Car) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या बातमीनुसार देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ऑगस्ट महिन्यात आपल्या काही लोकप्रिय कार्सवर बंपर डिस्काउंट ऑफर (Discount Offers) देत आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी कार घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया मारुती सुझुकी ग्राहकांना ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या कार्सवर किती डिस्काउंट देत आहे.
Maruti Suzuki Alto K10
भारतीय बाजारात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी कार Alto K10 च्या VXi AMT आणि VXi+ AMT व्हेरियंटवर कंपनीकडून ऑगस्ट महिन्यात 57,100 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. तर मॅन्युअल आणि सीएनजी व्हेरियंटवर तुम्हाला 40,000 आणि 25,000 रुपयांपर्यंत रोख सवलत मिळणार आहे.
याच बरोबर Alto K10 च्या सर्व व्हेरियंटवर 15 हजार रुपयांचे एक्सचेंज आणि 2,100 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस देखील कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. Alto K10 ची भारतीय बाजारात किंमत 3.99 लाख ते 5.96 लाखांदरम्यान आहे.
Maruti Suzuki S-Presso
ऑगस्ट महिन्यात कंपनी S-Presso या कारच्या सर्व व्हेरियंटवर 15 हजार रुपयांचे एक्सचेंज आणि 2,100 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस देत आहे. तर AMT व्हेरियंटवर 52,100 रुपयांपर्यंतची सूट आणि मॅन्युअल आणि CNG व्हेरियंटवर 30,000 रुपयांपर्यंतची रोख सूट कंपनीकडून देण्यात येत आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 4.26 लाख ते 6.12 लाख रुपये आहे.
Maruti Suzuki Wagon R
ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकी सर्वात जास्त डिस्काउंट Wagon R या लोकप्रिय कारवर देत आहे. तुम्हाला ऑगस्ट महिन्यात या कारवर तब्बल 67,100 रुपयांची सूट मिळणार आहे. तर या कारच्या मॅन्युअल आणि AMT व्हेरियंटवर 30,000 आणि 35,000 रुपयांपर्यंत रोख सूट देण्यात येत आहे. याच बरोबर सर्व व्हेरियंटवर 15 हजार एक्सचेंज आणि 2,100 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. तर 20,000 रुपयांची अतिरिक्त सूट आणि 5,000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. बाजारात मारुती वॅगन आरची किंमत 5.54 लाख ते 7.33 लाख रुपये आहे.
Parli Train Accident : परळीमध्ये रेल्वे अपघात, मेंढपाळासह 22 मेंढ्या जागीच ठार
Maruti Suzuki Eeco
तर Eeco वर देखील तुम्हाला या महिन्यात बंपर सूट देण्यात येत आहे. या कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर 30 हजार रुपयांपर्यंतची सूट तर CNG व्हेरियंटवर 10,000 रुपयांची रोख सूट आणि सर्व व्हेरियंटवर 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिले जात आहे. सध्या भारतीय बाजारात या कारची एक्सशोरुम किंमत 5.32 लाख ते 6.58 लाख रुपये आहे.