Solapur Central Railway Bharti 2023 : भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आता रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही डॉक्टर असाल आणि रेल्वेत काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक संधी चालून आळी. ती म्हणजे, मध्य रेल्वे अंतर्गत विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
LPG Price Hike : दिवाळीआधीच दणका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ
या भरतीद्वारे सोलापूर विभागातील रुग्णालयांसाठी ‘व्हिजिटिंग स्पेशलिस्ट’ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. या सोलापूर सेंट्रल रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे स्थान याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
पदाचे नाव – व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट
एकूण पदांची संख्या – 9
पदांचा तपशील-
व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट/रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर
ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट 01
रेडिओलॉजिस्ट – 01
सर्जन – 01
नेत्ररोग तज्ञ – 01
फिजिशियन- ०१
शल्य चिकित्सक – 01
व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट/ रेल्वे हॉस्पिटल, कुर्डूवाडी
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ: ०१
फिजिशियन वैद्य – 01
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ: 01
फिजिशियन – 01
शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. पी. जी पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित स्पेशलायझेशनमध्ये किमान 3 वर्षांचा व्यावसायिक कामाचा अनुभव.
पीजी डिप्लोमा नंतर संबंधित स्पेशलायझेशनमध्ये 5 वर्षांचा व्यावसायिक कामाचा अनुभव.
नोकरी ठिकाण – सोलापूर
वयोमर्यादा – 30 ते 65 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन.
अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, विभागीय रेल्वे रुग्णालय सोलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाइट – https://cr. indianrailways.gov.in/
पगार- भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 52 हजार रुपये वेतन दिले जाईल.
असा अर्ज करा-
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
कारण अर्ज करतांना कोणतीही चुक झाल्यास अर्ज नाकारला जाईल. महत्वाचं म्हणजे, शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सबमिट करा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1tAHEmZdMxMYpf2QUIIl_k7xD7J-fCYda/view