Download App

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना

LetsUpp l Govt. Schemes
आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology)वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे. जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे. कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतक-यांच्या एकूण उत्पन्नात वृध्दी करणे. समन्वयीत पध्दतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सुक्ष्म सिंचन पध्दती विकसीत करणे, त्याची वृध्दी व प्रसार करणे. कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी (unemployed)रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

WTC Final : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने शुबमन व पुजाराला चकवले, बॉल सोडण्याच्या नादात गमावली विकेट, पहा व्हिडिओ

योजनेसाठी अटी :
शेतक-याच्या नावे मालकी हक्काची जमीन असावी
शेतक-याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी
विद्युत पंपाकरीता कायमस्वरुपी विद्युत जोडणी असावी.
राष्ट्रीयकृत / शेदुल्द बँकेत खाते असावे.

लाभाचे स्वरूप :
योजनेंतर्गत बसविलेल्या सुक्ष्म सिंचन संचासाठी केंद्र शासनाने विहीत केलेल्या अनुदान प्रमाणानुसार अनुदान स्वरुपात लाभ देणे

आवश्यक कागदपत्रे :
संच बसविण्यात येणा-या क्षेत्राचा 7/12 उतारा
मालकी हक्कासंदर्भातील 8/अ खाते उतारा
बँक पासबूकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
शेतक-याच्या आधारकार्ड ची झेरॉक्स प्रत ”

संपर्क कार्यालयाचे नाव : “सबंधित जिल्हयातील तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी”

अर्ज करण्याचे संकेतस्थळ : www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावरील ई-ठिबक आज्ञावली

Tags

follow us