Download App

Citroen eC3 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

नवी दिल्ली : फ्रेंच कार कंपनी Citroen नं इलेक्ट्रिक EC3 भारतीय बाजारात लॉन्च केलीय. यात कोणते फिचर्स देण्यात आले आहेत? बॅटरी चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर चालेल? तसेच कंपनीनं त्याची किंमत काय ठेवली आहे आणि कोणत्या इलेक्ट्रीक कारसह ती बाजारात स्पर्धा करेल. याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

EC3 भारतीय बाजारपेठेत Citroen नं लॉन्च केले आहेत. Citroen ने लॉन्च केलेलं हे पहिलं इलेक्ट्रिक उत्पादन आहे. यासह, कंपनी सहा महिन्यांत आयसी इंजिन आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये उत्पादन लॉन्च करणारी देशातील पहिली कंपनी ठरलीय.

गायरान जमिनींवरील अतिक्रमण धारकांना राज्य सरकारचा दणका

बॅटरी आणि रेंज
Citroen EC3 मध्ये, कंपनीनं 29.2KWH बॅटरी दिलीय आणि 3.3KW ऑनबोर्ड चार्जर वापरला आहे. ही बॅटरी होम चार्जरनं चार्ज करण्यासाठी जास्तीत जास्त 10 तास लागतात आणि DC फास्ट चार्जरद्वारे 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 57 मिनिटं लागतात. EC3 ला एका पूर्ण चार्जवर ARAI MIDC i प्रमाणित श्रेणी 320 किलोमीटर मिळते. जरी ते DC चार्जरद्वारे 100 टक्के चार्ज केले जाऊ शकते.

शक्तिशाली मोटर
Citroen EC3 इलेक्ट्रिक मोटर 56 bhp पॉवर आणि 143 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यामुळं ते 6.8 सेकंदात शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते. या इलेक्ट्रिक कारची सिंगल चार्जवर बॅटरी रेंज 320 किमी पर्यंत आहे. याची टॉप स्पीड 107 किमी प्रति तास इतका आहे.

वॉरंटी
Citroen eC3 ला देशातील 25 शहरात La Maison Citroen शोरूममधून विकली जाणारंय. या कारला कस्टमर ऑनलाइनवरून सुद्धा खरेदी करता येवू शकते. या इलेक्ट्रिक हॅचबॅकची बॅटरी पॅकवर तुम्हाला 7 वर्ष किंवा 140000 किलोमीटर पर्यंतची वॉरंटी, इलेक्ट्रिक मोटरवर 5 वर्षापर्यंत किंवा 100000 किलोमीटर पर्यंतची वॉरंटी आणि व्हीकल वर 3 वर्ष किंवा 125000 किलोमीटर पर्यंतची वॉरंटी दिली जातेय.

किंमत
सिट्रोएन EC3 ला लाइफ, फील, फील वाइब पॅक आणि फील डुअल टोन वाइब पॅक सारख्या चार व्हेरियंटमध्ये आणलीय. याची किंमत 11.50 लाख रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होतेय. ही इंट्रोडक्टरी किंमत आहे. त्यामुळं आगामी काळात या कारच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता. सिट्रोएन ईसी3 ला B2B आणि B2C सेगमेंटमध्ये आणले आहेत. याची डिलिव्हरी लवकरच सुरू होणारंय.

Tags

follow us