Download App

CSIR मध्ये या पदांच्या 444 जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

CSIR Recruitment 2024 : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. मनासारखी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, आजच्या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण शैक्षणिक पात्रता असूनही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करताना दिसतात. दरम्यान, जर तुम्ही पदवीधर असाल तर तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ने विभाग अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Divisional Officer) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे.

Ahmednagar Crime : चार खूनांच्या आरोपातून निर्दोष मुक्त; पण सिरीअल किलर अण्णा वैद्यचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू… 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2024 आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च रिक्रूटमेंट 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे स्थान याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर
एकूण रिक्त पदे– 444
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 33 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

Supreme Court मध्ये आज सुनावणी; कलम 370 रद्द करणे, योग्य की अयोग्य ठरणार 

अर्ज शुल्क –
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु 500.
मागासवर्गीय/माजी सैनिक/पीडब्ल्यूडी – कोणतेही शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अधिकृत संकेतस्थळ –
https://www.csir.res.in/

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात – 8 डिसेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024

जाहिरात
https://drive.google.com/file/d/1M-7GK38cu1W6eQgVvZWG-EmFhM_kIQOo/view

अर्ज प्रक्रिया: CSIR अंतर्गत केल्या जाणाऱ्या सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 12 जानेवारी 2024 पूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. उशीरा आणि अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा. कारण, चुकीचा किंवा अपूर्ण आलेला अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

Tags

follow us