टीव्ही बंद कर सांगून सांगून कंटाळलेल्या पालकांनी नक्की वाचावी अशी बातमी…

Samart Parenting Tips तुमच्या घरातही असं होतंय का? मुलं टीव्हीसमोर बसली की त्यांना वेळेचं भान राहत नाही... एक कार्टून संपलं की दुसरं सुरू

Samart Parenting Tips For Reduced Children TV Time

Samart Parenting Tips For Reduced Children TV Time

Samart Parenting Tips For Reduced Children TV Time : तुमच्या घरातही असं होतंय का? मुलं टीव्हीसमोर बसली की त्यांना वेळेचं भान राहत नाही… एक कार्टून संपलं की दुसरं सुरू.. एक व्हिडिओ संपला की दुसरा सुरू आणि आई-बाबांनी टीव्ही बंद करायला सांगितलं की, लगेच उत्तर येतं…”फक्त पाच मिनिटं अजून पण ही पाच मिनिटं कधी अर्धा तास होतात, तर कधी दोन तास…आता विचार करा, यावर उपाय काय? मुलांच्या हातातून रिमोट काढून घ्यायचा? टीव्हीच बंद करून टाकायचा? की मुलांना समजून घेऊन काहीतरी वेगळा मार्ग शोधायचा? पण, आता तुमच्या काळजीचं उत्तरं सापडलं.सध्या या भन्नाट गोष्टीची सोशल मीडियावर तुफान चर्चाय.. नेमकं असं काय जुगाड शोधलाय त्याबद्दल जाणून घेऊया…

तर, आपल्या भारतात जसे मुलं तासंतास टीव्ही बघत बसताच तसाच काहीसा प्रकार आपला शेजारी देश चीनमध्ये देखील आहे. यावर उपाय म्हणून चीनमधील शेनझेन शहरात राहणाऱ्या एका वडिलांनी यावर भन्नाट प्रयोग केलाय. त्यांचा मुलगापण टीव्ही पाहण्यात खूप वेळ घालवत होता. यामुळे त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं. यासाठी वडिलांनी आधी टीव्हीमधील प्रश्नोत्तरांची सुविधा वापरली. पण मुलाने ती चुकवण्याचा मार्ग शोधला. मग त्यांनी स्मार्ट प्लग लावून ठराविक वेळेनंतर टीव्ही बंद करण्याचा प्रयत्न केला. मुलाने तोही प्लग काढून टाकला.. शेवटी वडिलांनी AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली आणि इथून सुरू झाला एक भन्नाट प्रयोग…

वडिलांनी AI च्या मदतीने एक खास प्रोग्राम तयार केलाय आता मुलगा टीव्ही पाहत असताना दर दहा मिनिटांनी स्क्रीनवर कधी गणिताचा, कधी इंग्रजीचा, तर कधी चिनी भाषेचा एक प्रश्न दिसतो.  प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तरच पुढे टीव्ही पाहता येतो. उत्तर चुकलं तर, आणखी एक प्रश्न सोडवावा लागतो. आणि विशेष म्हणजे… वडिलांना वाटलं होतं की, मुलगा या पद्धतीला विरोध करेल. पण आश्चर्य म्हणजे मुलालाच हे प्रश्न सोडवण्यात मजा येऊ लागली.

आता तुम्ही फक्त एक भन्नाट टेक्नॉलॉजी म्हणून पाहू नका. कारण, यामध्ये पालकांसाठी एक मोठा विचार दडलेला आहे. आजच्या मुलांना मोबाईल, टीव्ही, गेम्स आणि इंटरनेटपासून पूर्णपणे दूर ठेवणं कदाचित शक्य नाही. पण त्यांचा स्क्रीन टाइम कसा वापरला जातो, हे नक्कीच आपल्या हातात आहे. कारण प्रश्न फक्त मुलं किती वेळ स्क्रीनसमोर बसतात हा नाही… तर त्या वेळेत त्यांच्या मेंदूला नेमकं काय मिळतंय, हा आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. प्रत्येक मुलावर प्रश्न विचारण्याची किंवा टीव्हीवर नियंत्रण ठेवण्याची पद्धत चालेलच असं नाही.

मुलांना सतत परीक्षेला बसवल्यासारखं वाटलं, तर शिकण्याची आवड कमीही होऊ शकते. म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर शिक्षा म्हणून नाही, तर शिकण्याचं एक मजेशीर माध्यम म्हणून केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही कार्टून पाहण्याआधी एक छोटसं कोडं सोडवाय द्या. आवडता कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यावर दोन प्रश्नांवर चर्चा करणं असे प्रगोय तुम्ही करू शकता.

मुलांना फक्त टीव्हीपासून दूर ठेवणं हे पालकांचं ध्येय नसावं. तर टीव्ही, मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा, हे शिकवणं महत्त्वाचं आहे. कारण मुलांच्या हातातून रिमोट काढून घेणं सोपं आहे पण, त्यांच्या हातात विचार करण्याची क्षमता देणं अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलांचा स्क्रीन टाइम नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काय करता? हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा..

 

Exit mobile version