Download App

डोळ्यांखालील काळी वर्तुळे होतील दूर… जाणून घ्या उपाय

मुंबई : डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने झोप न लागणे, नीट झोप न लागणे, खाण्यापिण्याची कमतरता ही या समस्येची कारणे असू शकतात. डोळ्यांखालील काळी वर्तुळे तुमचा लुक पूर्णपणे खराब करतात. पण आता काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याच्या साह्याने तुम्ही सहजरित्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करू शकतात.

बर्फाचे तुकडे : काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही बर्फाची मदत घेऊ शकता. यासाठी बर्फाचे तुकडे घ्या आणि कापडात गुंडाळा. यानंतर, डोळ्यांखालील त्वचेवर काही मिनिटे लावा. असे केल्याने काळी वर्तुळे हळूहळू कमी होतात आणि गायब होऊ लागतात.

काकडी : काकडीमध्ये भरपूर पाणी असते आणि त्याच वेळी त्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा वापर करू शकता. यासाठी काकडी किसून घ्या आणि नंतर काही वेळ डोळ्यांवर लावा. असे केल्याने थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो.

Sharad Pawar : ‘सरकार बदलण्याचा देशाचा मूड’; शरद पवारांचं मोठं विधान

टीबॅग : टीबॅग देखील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी फक्त दोन वापरलेल्या चहाच्या पिशव्या काही वेळ फ्रीझरमध्ये ठेवा. नंतर डोळ्यांना लावा. हे रक्ताभिसरण वाढवून काळ्या वर्तुळांचा सामना करण्यास मदत करते.

सरकारविरोधात आंदोलन करणं भोवलं; ‘नोबेल’ विजेते कार्यकर्त्याला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

बटाटा : डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे लवकरात लवकर घालवायची असतील तर बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्यांवर लावावा. नंतर डोळे धुवून टाका.

Tags

follow us