डिस्ने+ हॉटस्टारचे नेटफ्लिक्सच्या पावलावर पाऊल, यूजर्सना धक्का

Disney+ Hotstar Policy : Netflix नंतर आता आणखी एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने यूजर्सना धक्का दिला आहे. डिस्ने + हॉटस्टार लवकरच त्यांच्या प्रीमियम यूजर्सना पासवर्ड शेअरिंगच्या मर्यादेवर निर्बंध घालू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार की डिस्ने + हॉटस्टार नवीन पॉलिसी लागू करण्यावर काम करत आहे. यानंतर प्रीमियम यूजर्स एका आकाउंटतून फक्त 4 डिव्हाइसवर लॉग इन करू शकतील. डिस्ने + […]

Disney+ Hotstar Policy

Disney+ Hotstar Policy

Disney+ Hotstar Policy : Netflix नंतर आता आणखी एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने यूजर्सना धक्का दिला आहे. डिस्ने + हॉटस्टार लवकरच त्यांच्या प्रीमियम यूजर्सना पासवर्ड शेअरिंगच्या मर्यादेवर निर्बंध घालू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार की डिस्ने + हॉटस्टार नवीन पॉलिसी लागू करण्यावर काम करत आहे. यानंतर प्रीमियम यूजर्स एका आकाउंटतून फक्त 4 डिव्हाइसवर लॉग इन करू शकतील. डिस्ने + हॉटस्टारचा हा निर्णय पासवर्ड शेअरिंगची समस्या सोडवण्यासाठी घेण्यात येत आहे.

रॉयटर्सच्या मते, डिस्नेही आता नेटफ्लिक्सच्या मार्गावर आहे. यापूर्वी मे महिन्यात डिस्नेच्या प्रतिस्पर्धी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने 100 हून अधिक देशांमध्ये पासवर्ड शेअरिंगसाठी समान धोरण लागू केले होते. नेटफ्लिक्सने ग्राहकांना सांगितले की आता यूजर्सना त्यांच्या कुटूंबाबाहेर पासवर्ड शेअर करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

हॉटस्टारने चाचणी केली
सध्या भारतात प्रीमियम डिस्ने + हॉटस्टार खाते 10 डिव्हाइसवर लॉग इन केले जाऊ शकते. मात्र, आता वेबसाइटने चार डिव्हाइसची मर्यादा निश्चित केली आहे. कंपनीने या धोरणाची अंतर्गत चाचणी केली आहे आणि येत्या काही आठवड्यांत ते सर्व यूजर्सना लागू केले जाऊ शकते. नवीन पॉलिसीसह चार डिव्हाइसपर्यंत प्रीमियम आकाउंट मर्यादित ठेवण्याचा कंपनीचा विचार आहे.

PHOTO : एरिका फर्नांडिसने भारत सोडत दुबईला स्थलांतरित झाली, अभिनेत्रीने गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले

Disney, Netflix, Amazon आणि JioCinema यांना भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मीडिया पार्टनर्स एशियाच्या मते, भारताचे स्ट्रीमिंग मार्केट 2027 पर्यंत $7 अब्ज उद्योग बनण्याची अपेक्षा आहे. डेटा दर्शवितो की हॉटस्टार सध्या जास्तीत जास्त यूजर्सच्या बाबतीत आघाडीवर आहे आणि सध्या जवळपास 50 दशलक्ष सदस्य आहेत.

Video : जो रुटने घेतला भयानक कॅच, ऑस्ट्रेलियन फलंदाजही हैराण

रिसर्च फर्म मीडिया पार्टनर्स एशियाने सांगितले आहे की जानेवारी 2022 ते मार्च 2023 दरम्यान डिस्ने हॉटस्टार भारताच्या स्ट्रीमिंग मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. एकूण 38 टक्के प्रेक्षकसंख्या मिळवली आहे.

Exit mobile version