Download App

Diwali 2023 : फराळ बनवताना शंकरपाळे बिघडतात? जाणून घ्या रेसीपी…

Diwali 2023 : दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे गृहीणींना फराळ बनवण्याची घाई झालेली आहे. मात्र अनेकदा गडबडीमध्ये फराळातील पदार्थ बिघडतात. त्यात शंकरपाळे जास्त बिघडण्याची शक्यता असते. कारण शंकरपाळे अनेकदा कडक होतात किंवा वातट होतात. तर अनेकदा तळताना तेलात विरघळतात देखील त्यामुळे शंकरपाळे बिघडू नये म्हणून त्याची खास रेसीपी जाणून घ्या…

गोड शंकरपाळे :

साहित्य – अर्धा कप दूध, अर्धा कप तूप आणि 3 पाव कप पिठी साखर, 3 कप मैदा.

कृती – एका भांड्यात तूप, पिठी साखर आणि दूध घ्यावं, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर भांड्यातील हे मिश्रण गॅसवर ठेवावं. मंद आचेवर, फक्त साखर वितळेपर्यंत गरम करावे. तसेच या मिश्रणाला उकळी अजिबात येऊ देऊ नये. त्यानंतर तूप-साखर-दुधाचं मिश्रण जेवढं आहे. तेवढंच मैद्याचं पीठ घालायचं.

R. Tamil Selvan : भाजप आमदाराला तुरुंगवासाची शिक्षा; अधिकाऱ्यांना मारहाण करणं भोवलं

आपण घेतलेल्या मिश्रणानुसार साधारण 3 कप मैदा पुरेल. या पीठाचा गोळा करून घ्या. खूप घट्ट किंवा पातळ करू नये. मध्यम प्रमाणात भिजवावा. शंकरपाळ्याचा हा गोळा एक तासभर झाकून ठेवावा. तासाभरानंतर पोळीसाठी जसा घेतो, तसा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्यावा. पोळीच्या कणकीसारखा हा गोळा एकजीव होत नाही. पोळी लाटताना या गोळ्याला बाहेरून भेगा पडलेल्या दिसतात. हे नॉर्मल आहे. आपल्याला हव्या तशा शंकरपाळ्या जाड किंवा पातळ लाटून घ्याव्यात.

Manipur : मणिपुरात आणखी काही दिवस इंटरनेट बंदच; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

छान आकारात हव्या असतील तर या पोळीच्या आधी कडा काढून घ्याव्यात. त्यानंतर आडवे-उभे-तिरपे काप देऊन शंकरपाळे करावेत. सगळे शंकरपाळे बनवेपर्यंत कापलेले शंकरपाळे एका ताटाखाली झाकून ठेवावेत. कढईत तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करून घ्यावे. तेल खूप कडकडीत गरम करू नये. मध्यम आचेवर शंकरपाळे तळून घ्यावेत. सगळ्या बाजूने तांबूस रंग येईपर्यंत हलवत रहावे. तांबूस रंग आल्यानंतर कढईतून बाजूला काढून टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत. हे शंकरपाळे दोन ते तीन आठवडे चांगले राहतात.

Tags

follow us