Download App

DRDO मध्ये ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 31 हजार रुपये पगार

  • Written By: Last Updated:

DRDO Recruitment : जर तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे (DRDO) ने ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक इच्छुक उमदेवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, मुलाखतीची तारीख, वेतन, नोकरीचे ठिकाण आदी तपशील अधिकृत नोटिफिकेशमध्ये देण्यात आले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो

एकूण पदांची संख्या – 11

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून पदवीधर असले पाहिजेत. त्याच्याकडे त्या पदानुसार आवश्यक पदवी असणे आवश्यक आहे.

संबंधित क्षेत्रात BE/B.Tech, ME/M.Tech

नोकरीचे ठिकाण – पुणे

वयोमर्यादा –
जेआरएफ करता मुलाखतीच्या ताऱखेनुसार कमाल वयोमर्यादा 28 वर्षे.
अजा/अजजाकरता 5 वर्ष
इमाव उमेदवारांकरता – 3 वर्ष

वयोमर्यादा ठरवण्याची निर्णायत तारीख ही मुलाखतीची शेवटची तारीख राहिल.

‘आमचं आरक्षण त्यांन देऊ नका, अन्यथा…’, सरकारने जीआर काढल्यानंतर कुणबी समाज आक्रमक 

निवड प्रक्रिया

मुलाखतीद्वारे
उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –
दहावी परीक्षेची गुणपत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेनुसार विविध प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – 9 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – http://www.drdo.gov.in

पगार– भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना 31 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.

जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1ULxmudWLi3oHuTwYUl7f_toEAJikZ5-H/view

 

Tags

follow us