Massive trolling of mayoral candidate for Eating biryani with hands What does the study say? सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये न्यूयॉर्क सिटीचे 2025 चे मेयर पदाचे उमेदवार जोहरान ममदानी हे आपल्या हाताने बिर्याणी खाताना (Eating biryani with hands) दिसत आहेत. ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र या व्हिडिओवर नेटकरांनी प्रचंड प्रश्न उपस्थित केले. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत, हाताने बिर्याणी खाणं म्हणजे घाणेरडं आणि थर्ड क्लास असल्याचे म्हटलं आहे. मात्र खरंच हाताने खाणे किंवा जेवण करणे हे योग्य आहे किंवा नाही. याबाबत आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान काय सांगतं? जाणून घेऊ सविस्तर…
अंदाज समितीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; चांदीच्या ताटातून सदस्यांचा शाही जेवणावर ताव
आयुर्वेदामध्ये काय सांगितले?
आयुर्वेदानुसार आहार हा केवळ शरीराचे पोषण करत नाही. तर हा एक आध्यात्मिक अनुभव आहे. तसेच आयुर्वेद सांगतं की, हाताने केलेले जेवण (Eating biryani with hands) हे पचनशक्ती मजबूत करतं. अन्नाला झालेला बोटांचा स्पर्श मेंदूला आता जेवण सुरू होणार आहे. अशी सूचना करतो. जेणेकरून तोंडामध्ये लाळ बनायला सुरुवात होते. लाळेमुळे पचनक्रिया सुधारते. अन्न योग्य पद्धतीने पचतं.
..फक्त ४० रुपयांत पोटभर जेवण! गायक अरिजीत सिंगच्या ‘बजेट-फ्रेंडली रेस्टॉरंट’ जोरदार चर्चा
आधुनिक विज्ञान काय सांगतं?
तर हाताने जेवण (Eating biryani with hands) करण्याबाबत आधुनिक विज्ञानामधील संशोधन सांगायचं झालं, तर अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन यांच्या 2009 च्या एका अभ्यासानुसार जे लोक हाताने जेवण जेवतात. त्यांचं जेवणावर जास्त लक्ष केंद्रित असतं. तसेच संतुलन देखील राखलं जातं. ज्याला माइंडफुल इटिंग म्हटलं जातं. त्याचबरोबर हाताने जेवल्याने अतिरिक्त ज्याला आपण ओव्हरटिंग म्हणतो ते होत नाही. जेणेकरून तुमचं वजन संतुलित राहून प्रकृतीमध्ये सुधारणा होते.
Zohran says his worldview is inspired by the 3rd world while eating rice with his hands pic.twitter.com/FDaQfcNSJv
— End Wokeness (@EndWokeness) June 29, 2025
1 एप्रिलपासून प्रीमियम हॉटेल्समध्ये जेवण महागणार, द्यावं लागणार 18% GST
दुसरीकडे इंटरनॅशनल जनरल ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रिशन यांच्याकडून 2016 मध्ये केलेल्या एका अभ्यासामध्ये हाताने जेवण (Eating biryani with hands) केल्याने पचनक्रियेसाठी लागणारे एंजामिन्स सक्रिय होतात. लाळ तेजीने निर्माण होते. लाळेमध्ये असणारे एमायलेज एंजामिन्स अन्न बारीक करायला मदत करते. ज्याने पचनक्रिया सुरळीत होते.
हाताने जेवताना ‘या’ गोष्टी टाळा
त्यामुळे आयुर्वेद असो किंवा आधुनिक विज्ञान या दोन्हींनुसार हाताने जेवण योग्य आणि फायदेशीर आहे. तरी देखील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामध्ये जेवणा अगोदर आणि नंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. हाताने जेवणार असाल तर तुमच्या हाताची नको कायम स्वच्छ आणि छोटे ठेवा. तसेच ज्या ठिकाणी तुम्हाला जेवणाअगोदर हात धुवायला पाणी नसल्यास त्या ठिकाणी सॅनिटायझर चा वापर नक्की करा.