Download App

एकलव्य आर्थिक सहाय्य योजना

LetsUpp | Govt. Schemes

होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना (becoming And Poor students)पदव्युत्तर शिक्षण (Post Graduate Education) पूर्ण करता यावे यासाठी सुरु केली आहे. (सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.) राज्य शासनाकडून (State Govt)ऑफलाईन पध्दतीने सन १९९५-९६ या शैक्षणिक वर्षापासून एकलव्य आर्थिक सहाय्य योजना (Eklavya Financial Assistance Scheme)सुरु केली आहे, होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी शासनाने ही योजना सुरु केलेली आहे.

‘राजकारणी अनेक ठिकाणी मारतात डोळे, त्यांचे त्यांनाच माहित’ ; अमृता फडणवीसांचा रोख कुणाकडे ?

योजनेच्या प्रमुख अटी :
– विधी, वाणिज्य व कला शाखेमध्ये किमान ६० टक्के व विज्ञान शाखेकरिता किमान ७० टक्के पदवी अभ्यासक्रमामध्ये गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
– लाभार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
– सदर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
– संबंधित लाभार्थी कुठेही पूर्ण किंवा अर्धवेळ नोकरी करणारा नसावा.

लाभाचे स्वरूप : पदव्युत्तर स्तर (२ वर्ष) साठी – प्रतिवर्ष ५०००/- सदर रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ ईडिया पुणे कोषागार शाखा, पुणे यांचामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा करण्यात येते.

कुठे संपर्क साधावा : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -४११ ००१.

अर्ज करण्याची पद्धत : नवीनमंजूरी / नूतनीकरणासाठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर नुतनीकरणाचा अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.

(टीप : योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात, तरी वाचकांनी सदर माहितीची पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us