ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटर विकत घेतलं, तेव्हापासून ते ट्विटरवर राज्यच करत आहेत. त्याच आज एक नवीन उदाहरण पाहायला मिळत आहे. आज इलॉन मस्क ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स होणारी व्यक्ती बनली आहेत. त्यांनी आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही मागे टाकले आहे.
इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर $44 बिलियनमध्ये विकत घेतले. तेव्हापासून ते ट्विटरवर सर्वाधिक सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचे फॉलोअर्स सतत वाढत चालले आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार बराक ओबामा यांचे सध्या 133,042,819 फॉलोअर्स आहेत. त्यांच्या तुलनेत इलॉन मस्क यांचे 133,068,709 फॉलोअर्स झाले आहेत. त्यानंतर गायक जस्टिन बीबर यांचे 113 मिलियन केटी पेरी यांचे 108 मिलियन फॉलोअर्ससाठी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये 100 मिलियन फॉलोअर्सचा आकडा गाठला आणि तेव्हापासून त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यावेळी ट्विटरवर सार्वधिक फॉलोअर्स असणारे ओबामा फार कमी ट्विट करत असतात. ते सहसा प्रमुख सामाजिक मुद्द्यावर ट्विट करत असतात. पण इलॉन मस्क मात्र जगातील सर्वच विषयावर ट्विट करत असतात. अगदी मिम पासून अपडेट पर्यत ते ट्विट करत असतात.
मागच्या वर्षी ट्विटर विकत घेतल्यापासून इलॉन मस्क यांनी ट्विटर सीईओ म्हणून देखील जबाबदारी स्वीकारली आहे. ते घेताना ते म्हणाले होते की, ट्विटर विकत घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भविष्यातील समाजासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिथे एखाद्या विषयावर अधिक आत्मविश्वासाने सभ्य पद्धतीने चर्चा करता येईल. पण सध्या तरी याचा सर्वाधिक फायदा स्वतः एलॉन मस्कच घेत असल्याच दिसतंय.