गरजेपेक्षा जास्त लिंबाचे सेवन ठरते घातक

मुंबई : आपण आजवर लिंबाचे अनेक फायदे पाहिले असतील. लिंबू हे बहुगुणकारी फळ आहे. याचे अनेक फायदे आपण आजवर ऐकले तसेच अनुभवले असतील. वाढते वजन असो अथवा पोटाच्या समस्यां यावर लिंबू हे बहुगुणकारी ठरते. तसेच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील याचा प्रभावी वापर केला जातो. आपण थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी देखील पितो. आपण आजवर लिंबाचे […]

Untitled Design   2023 04 03T144831.966

Untitled Design 2023 04 03T144831.966

मुंबई : आपण आजवर लिंबाचे अनेक फायदे पाहिले असतील. लिंबू हे बहुगुणकारी फळ आहे. याचे अनेक फायदे आपण आजवर ऐकले तसेच अनुभवले असतील. वाढते वजन असो अथवा पोटाच्या समस्यां यावर लिंबू हे बहुगुणकारी ठरते. तसेच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील याचा प्रभावी वापर केला जातो. आपण थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी देखील पितो. आपण आजवर लिंबाचे फायदे जसे पाहिले तसे आपण आता लिंबाच्या रसाचे अतिसेवन कसे धोकादायक ठरू शकते याबाबत जाणून घेऊ.

जास्त लिंबू खाण्याचे तोटे आज आपण जाणून घेऊ

पोटदुखी : रिकाम्या पोटी लिंबू पाणी मधासोबत सेवन केल्याने पचनप्रक्रिया सुरळीत होते. मात्र लिंबाचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटाची समस्या उद्भवू शकते. तसेच तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

डिहायड्रेशन
लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकले जातात. मात्र जास्त लिंबामुळे तुमचे मूत्राशय मोठे होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला वारंवार बाथरूममध्ये जावे लागते. ज्यामुळे तुम्हाला थकवा देखील जाणवू शकतो.

दातदुखी
लिंबाचा रस खूप आम्लयुक्त असतो. मात्र लिंबाचा रस जास्त पिल्यास तुमच्या दातांना मुंग्या येऊ लागतात. जेव्हा दातांमध्ये संवेदनशीलता असते तेव्हा तुम्ही लिंबूसारख्या सायट्रिक गोष्टींचे सेवन कमी करायला सुरुवात करावी.

ड्राय स्किन
त्वचेच्या अनेक समस्यांवर लिंबू हे फायदेशीर समजले जाते. मात्र हेच लिंबू तुमची त्वचा लवकर कोरडी देखील करू शकते. जर तुमची त्वचा कोरडी असेल आणि तुम्ही भरपूर लिंबू वापरत असाल तर ते तुमची समस्या वाढवू शकते. तुमची त्वचा कोरडी होते.

केसांच्या समस्या
केसांच्या वाढीसाठी लिंबू हे फायदेशीर मानले जाते. मात्र हेच लिंबू केसांसाठी घातक देखील ठरू शकते. केसांवर डायरेक्ट लिंबू कधीही लावू नका. यामुळे केस निर्जीव होऊ शकतात. कोंडा दूर करण्यासाठी अनेक लोक या उपायाचा वापर करतात. तुम्ही केसांवर लिंबाचा रस थेट लावू नये.

Exit mobile version