सोशल मीडिया कंपनी मेटा कडून आपल्या युजर्ससाठी काही नवीन अपडेट जाहीर केले आहेत. यामध्ये फेसबुककडून रिल्सची वेळ वाढवली आहे, आधी ६० सेकंदाची रील शेअर करता येत होती. नवीन अपडेटनुसार आता युझर्सना ९० सेकंदाची रिल्स शेअर करता येणार आहे.
https://twitter.com/MetaforCreators/status/1631700974191665152
फेसबुकच्या आधी काही दिवस इंस्टाग्रामवर ९० सेकंदाची रिल्स शेअर करता येत होते. युट्युबनेही शॉर्टची वेळ वाढवली होती. त्यामुळे फेसबुककडून देखील हे नवीन अपडेट जारी केले आहे.
याशिवाय फेसबुक रिल्ससाठी काही नवे फीचर्स देखील आणण्यात आले आहेत. यामध्ये क्रिएटरसाठी नवीन टेम्प्लेटदेखील आणले गेले आहेत. ट्रेंडिग टेम्पलेट या नव्या फीचर्समुळे कंटेंट क्रिएटर ट्रेंडिग टेंप्लेट वापरून रिल्स बनवू शकणार आहेत. त्यामुळे तुम्ही बघितलेल्या एखाद्या रिल्सप्रमाणे नवीन रिल्स तुम्ही बनवू शकणार आहेत.