File cases against share traders : शेअर मार्केटच्या (share market) माध्यमातून गुंतवणूकदारांना जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढवत आहे. नागरिकांकडून लाखो रुपये जमा करून पोबारा करणाऱ्या शेअर ट्रेडर्स (Share traders) धारकांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या सर्व पळून गेलेल्या ट्रेडर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत आहे.
जुमल्याचं नाव गॅरंटी, आता भाजप चारशे पार नाही, तडीपार होणार; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र
चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवल्यानं गुंतवणुकदारांनी शेतीमाल विकून, बचत गटाचे व बँकेचे कर्ज घेऊन, सोनेतारण ठेवून पैसे शेअर ट्रेडर्सच्या हवाली केले आहेत. मात्र, शेअर्स ट्रेडर्स पळून गेल्यानं आपल्याला गंडा घातल्या गेल्याचं गुंतवणूकदाराना लक्षात आलं. आयुष्यभराची जमा केलेली पुंजी शेअर ट्रेडर्स धारकांच्या नादी लागून हिरावली गेल्याने आता पुढे काय या भावनेने नागरिक हतबल झाले. आता या ट्रेडर्सचा शोध घेण्याची गरज गुंतवणूकदारांना वाटू लागली आहे.
चारशे सोडा हे दोनशेही पार करणार नाही… रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांची चापडगाव (ता. शेवगाव) (Shevgaon)मध्ये येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे व संतोष गायकवाड यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली. या बैठकीला गदेवाडी, बेलगाव, अंतरवाली, सोनविहीर, वरखेड, खामपिंपरी, प्रभूवाडगाव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी काही नागरिकांनी धनादेश, जमा पावत्या व अन्य पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले. यावेळी शेवगाव पोलिस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
येत्या दोन दिवसात सविस्तर निवेदन करून प्रातांधिकारी, तहसीलदार, शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांची गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.