Download App

‘टीबी’चा विळखा करा सैल! आरोग्य मंत्रालयाने सांगितली 10 लक्षणे; वाचा अन् उपाय अमलात आणाच..

टीबी अर्थात क्षयरोग एक संसर्गजन्य (Tuberculosis) रोग आहे. या आजारात शरीरातील फुप्फुस प्रभावित होतात.

Tuberculosis : टीबी अर्थात क्षयरोग एक संसर्गजन्य (Tuberculosis) रोग आहे. या आजारात शरीरातील फुप्फुस प्रभावित होतात. या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आजाराचे दहा लक्षणे सांगितली आहेत. या लक्षणांकडे लक्ष देण्याची गरज आहे. यातील काही लक्षणे तीन ते चार आठवड्यांपासून दिसत असतील तर तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

क्षयरोगाच्या रुग्णसंख्येत मागील काही वर्षांत वाढ झाली आहे. भारताने सन 2025 पर्यंत देशातून या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय निश्चित केले होते. परंतु रुग्णांची वाढलेली संख्या पाहता सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आता मावळली आहे. पण, या आजाराला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सरकारने नक्कीच केले आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार सन 2015 मध्ये प्रति एक लाख लोकांत 237 टीबी रुग्ण आढळून येत होते. 2023 पर्यंत यात घट होऊन हा आकडा 195 वर आला होता. नवीन प्रकरणात 17.7 टक्क्यांची घसरण झाली आहे. तरी देखील देशात आजाराचे उच्चाटन होणे आता कठीण दिसत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते या आजाराच्या लक्षणांवर गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच आजाराचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार करणे देखील आवश्यक आहे.

‘फॅटी लिव्हर’ची समस्या वाढू देऊ नका, आरोग्य मंत्रालयाने दिला मेसेज; उपाय अमलात आणाच!

टीबी आजाराची लक्षणे काय?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आजाराची दहा लक्षणे सांगितली आहेत. यामध्ये सलग दोन आठवडे खोकला, संध्याकाळी ताप येणे, वेगाने वजन कमी होणे, थुंकीबरोबर रक्त पडणे, रात्रीच्या वेळी घाम येणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे, छातीत वेदना होणे, अलीकडच्या काळातील शारीरिक बदलाव आणि श्वासाशी संबंधित क्रॉनिक आजार या लक्षणांचा समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते क्षयरोगाचा उपचार शक्य आहे. स्वस्थ भविष्यासाठी आजच पावले उचला. आजाराच्या लक्षणांची माहिती करून लगेच उपचार सुरू करा. या आजाराची अधिक माहितीसाठी 1800-11-6666 या नंबरवर कॉल करू शकता.

कुणाला टीबीचा सर्वाधिक धोका

टीबी हा एक संसर्गजन्य आजार असून यात फुप्फुसांवर परिणाम होतो. तसेच शरीराच्या अन्य अवयवांना सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असते. हा आजार मायकोबैक्टेरियम ट्यूबरकुलोसिस नामक जीवाणूपासून होतो. अनेकवेळा तर आजार शरीरात असतो पण त्याची काहीच लक्षणे दिसत नाहीत. ही स्थिती दीर्घकाळ राहू शकते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर सक्रिय रूप घेऊ शकतो.

लग्नात नायट्रोजनचा धूर…नवरा नवरीची ग्रॅंड एन्ट्री बेतली चिमुकलीच्या जीवावर, वायू मानवी आरोग्यासाठी किती धोकादायक?

बचावासाठी काय कराल

खराब लाईफस्टाईल, खराब पोषण, मद्यपान, स्मोकिंग यामुळे क्षयरोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो त्यामुळे या गोष्टी आजच बंद करा.

जास्त गर्दी आणि खराब वेंटिलेशन असणाऱ्या ठिकाणी शक्यतो जाऊ नका. हा जिवाणू बंदिस्त वातावरण आणि गर्दीच्या ठिकाणी वेगाने वाढतो.

ज्या लोकांना आधी क्षयरोग झालेला असेल त्यांना हा आजार पुन्हा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

हा आजार प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून फैलावतो. जर एखादा संक्रमित व्यक्ती खोकतो, शिंकतो किंवा बोलतो त्यावेळी त्याच्या तोंडातून बेक्टेरिया युक्त ड्रॉपलेट बाहेर पडतात. यामुळे आसपासच्या लोकांना संक्रमण होण्याची दाट शक्यता असते. म्हणून एखाद्याला टीबी असेल तर त्याच्यापासून दूर राहणेच चांगले आहे. अशा वेळी तोंडाला नेहमी मास्क लावणे फायद्याचे ठरेल.

follow us