United Nations Report on Drinking Water : संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच (United Nations) एक धक्कादायक खुलासा केला आहे. जगभरातील तब्बल 210 कोटींहून अधिक लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मिळत नाही. प्रत्येक चारमधील एक व्यक्तीला दुषित पाणी पिणे भाग पडत आहे. मागील वर्षात जगात ही परिस्थिती होती. दहा कोटींपेक्षा जास्त लोक पिण्याच्या पाण्यासाठी नद्या, तलावांवर अवलंबून आहेत.
जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफच्या मते जल, स्वच्छता आणि आरोग्य सेवांत पिछाडीवर पडल्यामुळे अब्जावधी लोक आजारांच्या विळख्यात अडकले आहेत. या समस्येवर जगभरातच लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, 2030 पर्यंत याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल याची शक्यता कमीच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पर्यावरण प्रमुखे रुडिगर क्रेच यांनी सांगितले की पाणी, स्वच्छता आणि सफाई विशेषाधिकार नाही तर मुलभूत मानवाधिकार आहेत.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात ‘या’ आरोग्य योजनांचा होणार शुभारंभ
या रिपोर्टमध्ये पाच प्रकारच्या पिण्याच्या पाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पहिला म्हणजे असे पाणी जे तुमच्या घरापर्यंत येईल आणि यात घाण किंवा कोणतीही रसायने नसतील. या व्यतिरिक्त चार प्रकारचे पाणी आणखी आहे. दुसऱ्या प्रकारात स्वच्छ पाणी जे कमीत कमी अर्ध्या तासात मिळू शकेल. तिसऱ्या प्रकारात मर्यादीत साफ पाणी परंतु, पाणी मिळण्यास वेळ लागतो. पाचव्या प्रकारात पृष्ठभागावरील पाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की 2015 पासून आतापर्यंत 96 कोटी 10 लाख लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध झाले आहे. मागील वर्षात 210 कोटी लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी काही मिळू शकले नाही. यामध्ये 10.6 कोटी लोक जमिनीच्या पृष्ठभागावरील पाण्याचा वापर करत होते. या देशांंच्या संख्येत आगामी काळात वाढ होणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आधी शुगर बोर्ड आता ऑइल बोर्ड, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नवी आयडीया; CBSE बोर्डाचा आदेश काय?