Can Someone Survive With One Lung : पोप फ्रान्सिस यांनी (Pope Francis Death) वयाच्या 88 व्या वर्षी व्हॅटिकन सिटीमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. नुकतेच त्यांना न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्हॅटिकन सिटीमधील लाखो लोक पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. पोप यांना केवळ फक्त एकच फुफ्फुस होतं, असं सांगितलं जातंय. वयाच्या 21 व्या वर्षी (Can Survive With One Lung) आजारामुळे त्यांचे एक फुफ्फुस शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आलं होतं, अशी चर्चा सुरू आहे.
परंतु, हे पूर्णपणे खरे नाही. संपूर्ण फुफ्फुस नाही तर, आजारामुळे त्यांच्या फुफ्फुसाचा (Lung) फक्त एक भाग काढून टाकण्यात आला होता. परंतु जर एखाद्या व्यक्तीचे एक फुफ्फुस गेले तर तो जगू शकेल का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
दिल्लीतील वरिष्ठ डॉक्टर अजय कुमार यांनी टीव्ही 9 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, एका फुफ्फुसाने जगणे शक्य आहे, परंतु ते व्यक्तीचे वय, त्याचा वैद्यकीय इतिहास आणि जीवनशैली या अनेक घटकांवर अवलंबून असते. डॉ. अजय यांनी स्पष्ट केलंय की, जेव्हा एक फुफ्फुस काढून (Health Tips) टाकले जाते (न्यूमोनेक्टोमी), तेव्हा दुसरे फुफ्फुस त्याची कार्यक्षमता घेऊ शकते. ही प्रक्रिया सहसा कर्करोग किंवा इतर गंभीर परिस्थितींसाठी केली जाते. जर दुसरे फुफ्फुस निरोगी असेल आणि चांगले काम करत असेल, तर एका फुफ्फुसासोबत जगणे शक्य आहे.
मंत्री नितेश राणे गोमूत्र का पितात? एका वाक्यात दिलं ‘हे’ उत्तर
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते आपल्या फुफ्फुसांमध्ये इतकी क्षमता असते की. एक फुफ्फुस काढून टाकले तरी दुसरे फुफ्फुस शरीराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करू शकते. सुरुवातीला श्वास घेण्यास त्रास होणे, लवकर थकणे या काही समस्या असू शकतात, परंतु कालांतराने शरीर या परिस्थितीशी जुळवून घेते. पण एकाच फुफ्फुसासोबत जगणे सोपे नाही. यामुळे नेहमीच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, कोणत्याही शारीरिक हालचालींमध्ये अडचण येऊ शकते, प्रत्येक व्यक्तीला एकाच फुफ्फुसाने जास्त काळ जगणे शक्य नाही.
प्रत्येक पुरुषाचा फोटो काढा अन् घरच्यांना पाठवा; पिंक रिक्षा वाटपावेळी अजितदादांच्या ‘सेफ्टी टिप्स’
फुफ्फुसाचा कर्करोग, जुनाट क्षयरोगाचा संसर्ग, जन्मजात दोष किंवा अपघात यासारख्या काही गंभीर आजारांमध्ये, डॉक्टरांना फुफ्फुस काढून टाकण्याची शिफारस करावी लागते. या प्रक्रियेला न्यूमोनेक्टोमी म्हणतात. हे एक मोठे ऑपरेशन आहे. त्यानंतर रुग्णाला विश्रांती आणि विशेष काळजीची आवश्यकता असते. एका फुफ्फुसाने आयुष्य पूर्णपणे सामान्य नसले, तरी संतुलित आणि निरोगी ठेवता येते. यासाठी रुग्णाला त्याच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील, असं तज्ज्ञ सांगतात.
यामध्ये जड काम टाळणे, धूळ, धूर आणि प्रदूषणापासून दूर राहणे, श्वसनाचे आजार टाळणे, नियमित तपासणी करणे आणि फुफ्फुसांचे कार्य तपासणे, हलके व्यायाम आणि योगासने करणे यांचा समावेश आहे. जर रुग्णाने काळजी घेतली अन् डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केले, तर तो बराच काळ जगू शकतो. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे लोक एकाच फुफ्फुसाने 20-30 वर्षांहून अधिक काळ सामान्य जीवन जगले आहेत.