Pope Francis Passes Away : जगाने गमावला शांतीचा मसीहा; ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

  • Written By: Published:
Pope Francis Passes Away : जगाने गमावला शांतीचा मसीहा; ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

Pope Francis dies at 88, Vatican announces : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. फ्रान्सिस हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. नुकतेच त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाच्या बातमीनंतर जगभरातील १.४ अब्ज कॅथलिक नागरिक शोकसागरात बुडाले आहेत. व्हेटिकन न्यूजकडून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची माहिती देण्यात आलीय.

पोप फ्रान्सिस यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी व्हॅटिकन नोकरशाहीची पुनर्रचना केली तसेच त्यांनी ६५ हून अधिक देशांमध्ये प्रवास केला. पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथोलिक चर्चचे नेतृत्व करणारे पहिले लॅटिन अमेरिकन होते. १३ मार्च २०१३ रोजी त्यांची पोप म्हणून निवड करण्यात आली होती.

पोप कोणाला होता येतं?

कॅथलिक असलेल्या आणि बाप्तिस्मा विधी झालेल्या कोणत्याही पुरुषाला पोप होता येतं. बाप्तिस्मा हा कॅथलिक विधी असून तो झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला कॅथलिक मानलं जातं.

https://twitter.com/BNODesk/status/1914228353143292364

नवीन पोपची नियुक्ती करण्याची प्रक्रिया

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर, नवीन पोपची नियुक्ती करण्यासाठी कॉन्क्लेव्ह प्रक्रिया सुरू होईल, जी सहसा पोप यांच्या मृत्यूनंतर १५ ते २० दिवसांच्या दरम्यान होते. फ्रान्सिस यांनी त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी  ईस्टर संडेवेळी नागरिकांचे स्वागत केले होते. तसेच अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स (JD Vance) यांचीही भेट घेतली होती. मात्र, फ्रान्सिस यांच्या निधनामुळे व्हॅटिकन आणि जगभरातील कॅथोलिक समुदायात शोककळा पसरली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube