पनामा अन् कोस्टा रिका! भारतीयांना दुसऱ्या देशांत का धाडतोय अमेरिका? ट्रम्पचा प्लॅन नक्की काय?

Deportation : अमेरिकेतून डिपोर्ट केलेले भारतीय आणि अन्य देशांतील लोक दक्षिण अमेरिकेतील देश पनामामध्ये काय करत आहेत? अमेरिकेतील अवैध भारतीय प्रवाशांना आणखी कोणत्या देशात पाठवण्यात आले आहे? यामागे काय कारण आहे? या ठिकाणी भारतीय सध्या कोणत्या परिस्थितीत राहत आहेत? याची माहिती घेऊ या..
डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) अमेरिकेची सूत्रे हाती घेताच जगभरातील देशांत खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले आहेत. यातील एक निर्णय भारतासाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. अमेरिकेत बेकादेशीर मार्गाने प्रवेश करून राहत असलेल्या भारतीय नागरिकांना पुन्हा भारतात पाठवण्याचे काम अमेरिका सरकारने सुरू केले आहे. भारतासह अन्य देशांतील नागरिकांना सुद्धा त्यांच्या देशात परत पाठवण्यात येत आहे. या अभियानावर सरकारकडून कोट्यवधी डॉलर खर्च केले जात आहेत. याच दरम्यान पनामातून काही धक्कादायक फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोत अमेरिकेतून निर्वासित केलेल्या भारतीय नागरिकांना एक हॉटेलच्या खिडकीतून मदतीसाठी याचना करताना दिसत आहे. फोटो समोर येताच भारत आणि शेजारी देशांतील लोकांनी अमेरिकी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. यातच प्रत्येकाच्या डोक्यात हाच प्रश्न आहे की अमेरिकेतून डिपोर्ट केलेले भारतीय आणि अन्य देशांतील नागरिक पनामा देशात काय करत आहेत. ट्रम्प प्रशासनाने आणखी कोणत्या देशांत निर्वासितांना पाठवले आहे, यामागे काय कारण आहे, या देशांत भारतीय कोणत्या परिस्थितीत राहत आहेत, अमेरिकेचा पुढचा प्लॅन काय आहे असे प्रश्न विचारले जात आहेत.
अमेरिकेने आता पर्यंत तीन सैन्य विमानांच्या मदतीने 332 भारतीय नागरिकांना परत पाठवले आहे. पहिले विमान 5 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील अमृतसर येथे उतरले होते. यानंतर आणखी दोन विमाने भारतात दाखल झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा 11 लाख कोटींवर डोळा.. भारताला तेल देण्याची अमेरिकेला घाई
अमेरिकी मीडियातील काही दिवसांपूर्वीचा रिपोर्ट पहिला तर लक्षात येते की अमेरिकेने तीन वेगवेगळ्या देशांशी करार केला आहे. या नुसार अमेरिकेत राहत असलेल्या अवैध प्रवाशांना आधी दुसऱ्या देशात ठेवले जाईल. या देशांकडून याची जबाबदारी घेतली जात आहे. अमेरिकेने ज्या देशांशी असा करार केला आहे त्यात पनामा, ग्वाटेमाला आणि कोस्टा रिका या देशांचा समावेश आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबीयो यांनी या देशांतून अवैध प्रवासी पुन्हा त्यांच्या देशांत धाडण्यासाठी मदत केली जाईल असे सांगितले.
कोणत्या देशांत अडकले अप्रवासी भारतीय
मागील आठवड्यात पनामा देशात अमेरिकेची तीन विमाने दाखल झाली. यामध्ये आशिया आणि आफ्रिकेतील शेकडो लोकांचा समावेश होता. पनामात सध्या भारत, चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील नागरिकांचा समावेश आहे. या लोकांना अप्रवासी केंद्रांत ठेवण्यात आले आहे. मागील आठवड्यात दोनशे अवैध प्रवाशांना घेऊन एक विमान कोस्टा रिका देशात पोहोचले. तसेच एक विमान ग्वाटेमालात पोहोचले होते. यात भारतीय नागरिक नसल्याचे समोर आले.
पनामात भारतीयांची काय अवस्था
पनामा देशात साधारण 300 प्रवाशांना तात्पुरत्या स्वरुपात ठेवले जात आहे. जंगलात तयार करण्यात आलेल्या एका हॉटेलात या लोकांना ठेवले जात आहे. डॅकपोलिस नावाच्या हॉटेलमध्ये या लोकांना ठेवण्यात आल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. बुधवारी याच हॉटेलच्या खिडकीतून काही लोकांनी हात उंचावून मदत मागितली होती. पनामा सरकारने या हॉटेलबाहेर पोलीस तैनात केले आहेत. सुरक्षा मंत्री फ्रँक अब्रेगो यांनी सांगितले की प्रवाशांना नजरकैदेत ठेवलेले नाही. पनामा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या अवैध स्थलांतरीतांना हॉटेल बाहेर सोडले जात नाही. परंतु, त्यांच्या खाण्यापिण्याची आणि दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोस्टारिकात कोणत्या देशांचे नागरिक
अमेरिकेने पश्चिम आशियातील उज्बेकिस्तान, पाकिस्तान, किर्गिस्तान, कझाकस्तान आणि भारतातील अनेक प्रवाशांना कोस्टारिकात पाठवले आहे. सरकारने या लोकांना पनामा बॉर्डरच्या लगत असणाऱ्या एका शिबिरात ठेवले आहे. या लोकांना पुन्हा त्यांच्या देशात धाडण्यासाठी कोस्टारिका एका पुलाचे काम करील असे कोस्टारिका सरकारने स्पष्ट केले आहे.
कोस्टारिकातून प्रवासी लोकांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी येणारा सर्व खर्च अमेरिका करणार आहे. कोस्टारिकाचे राष्ट्रपती रोड्रिगो शावेज यांनी सांगितले की ट्रम्प सरकारच्या टॅरिफ निर्णयाचा परिणाम सहन करणे शक्य नाही म्हणून आम्ही या कामात अमेरिकेची मदत करत आहोत. जर अमेरिकेने कोस्टारिकाच्या वस्तूंवर टॅरिफ आकारण्यास सुरुवात केली तर देशाचे मोठे नुकसान होईल.
हातात बेड्या अन् पायांत साखळदंड, अवैध प्रवाशांचं वास्तव.. व्हाइट हाउसनेच जारी केला Video
दुसऱ्या देशांत निर्वासितांना धाडण्याचं कारण काय
अमेरिकेत बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करून तेथे राहत असलेल्या लोकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या फक्त तीन टक्के अवैध स्थलांतरीत आहेत. अमेरिकेत आजमितीस 22 टक्के लोक विदेशी आहेत. म्हणजेच जवळपास एक कोटींपेक्षा जास्त लोक परदेशातून अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. डोनाल्ड प्रशासनाने या सर्व विदेशी स्थलांतरीतांना त्यांच्या देशात पाठवण्याची घोषणा केली आहे.
राजनयिक पातळीवर कोणत्याही देशातील नागरिकास पुन्हा त्याच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे अमेरिका या लोकांना वेगवेगळ्या देशांत पाठवत आहे. पनामा, कोस्टारिका, ग्वाटेमाला या देशांशी केलेल्या करारानुसार निर्वासित लोकांना ठेवण्यासाठी अमेरिका या देशांना आर्थिक मदत करील. या बदल्यात हे देश काही काळासाठी स्थलांतरीतांना त्यांच्या देशात ठेवतील आणि त्यांना त्यांच्या पाठवण्यासाठी संपर्क करतील. स्थलांतरीतांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया तीन देश करतील.