पोप फ्रान्सिस यांचे निधन, कोण होणार जगातील सर्वांत मोठे धर्मगुरू? हे पाच चेहरे चर्चेत…

Pope Francis passes away, who will be the world’s greatest pontiff : कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले (Pope Francis) लॅटिन अमेरिकन नेते पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. मात्र आता त्यांच्या जागी कोण जगातील सर्वांत मोठे धर्मगुरू होणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात आता पाच चेहरे समोर आले आहेत. ज्यातील एक जण पोप फ्रान्सिस यांची जागा घेणार आहे.
नवे पोप कसे निवडतात?
पदावर असलेल्या पोपचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या वारसाबद्दल अधिकृत घोषणा केली जात नाही. त्यासाठी एक विशेष प्रक्रिया असते ज्याला पॅपल कॉन्क्लेव म्हटलं जात. जेव्हा पोपचा मृत्यू तेव्हा कॅथोलिक चर्चचे कार्डिनल्स ही निवड करतात. कार्डिनल्स वरिष्ठ हा पादरिंचा एक ग्रुप आहे. जे पोपला सल्ला देण्याचं काम करतात. तसेच याच कार्डिनल्समधूनच पोप निवडले जातात. पण पोप बनण्यासाठी कार्डिनल्स असणं गरजेच नाही.मात्र आता पर्यंतचे सर्व पोप हे अगोदर कार्डिनल्सचं होते.
कोण होणार नवे पोप?
व्हॅटिकन सिटीमध्ये 253 कार्डिनल्स आहेत. मात्र यातील 80 वर्ष वयाहून अधिकच्या लोकांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे नवे पोप निवडण्यात फक्त 138 कार्डिनल्सच भूमिका बजावणार आहेत.
एका फुफ्फुसाने माणूस किती काळ जगू शकतो? जाणून घेऊ या तज्ज्ञ काय सांगतात…
यामध्ये कार्डिनल पिएत्रो पारोलिन हे व्हॅटिकनच्या सत्ता संरचनेतील एक मोठं नाव आहे. ते गेल्या दशकापासून पोप फ्रान्सिस यांचे विश्वासू सहकारी आहेत. गृह सचिव आणि 2013 पासून व्हॅटिकनच्या कुटनीती आणि प्रशासनाचे नेतृत्व करत आहेत. त्याचं वय 70 वर्ष आहे. ते इटलीच्या वेनेतो क्षेत्रातील आहेत. 2014 साली त्यांना कार्डिनल पद मिळाले होते.
ग्राहकांनो, 1 मे पासून ATM मधून पैसे काढण्यासाठी अन् बॅलन्स चेक करण्यासाठी द्यावे लागणार ‘इतके’ पैसे
त्यानंतर कार्डिनल पीटर एर्डो पारंपारिक विचारांसाठी ओळखले जातात त्यांचं वय 72 वर्ष आहे. 2003 मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांना कार्डिनल बनवले होते. ते युरोपच्या बिशप संमेलनाचे माजीअध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच ते कॅथोलिक परंपरांचे कट्टर समर्थक मानले जातात. ते घटस्फोटीत आणि पुनर्विवाह करणाऱ्या कॅथोलिकांना पवित्र अन्नाचा अधिकार नाकारतात.
मंत्री नितेश राणे गोमूत्र का पितात? एका वाक्यात दिलं ‘हे’ उत्तर
कार्डिनल मातेओ ज़ुप्पी हे कॅथोलिक चर्चमधील सर्वात प्रगतीशील आणि प्रभावशाली चेहरा आहे. ते पोप फ्रान्सिस यांच्या आवडत्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचं वय 69 आहे. 2022 पासून ते इटलीच्या एपिस्कोपल कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष आणि 2019 मध्ये त्यांनी पोप फ्रान्सिस यांनी त्यांना कार्डिनल केलं होतं. तर कार्डिनल रेमंड बर्क कॅथोलिक चर्चमधील सर्वात पारंपारिकवादाचा चेहरा आहे. ज्यांचं वय 70 वर्ष आहे. 2010 मध्ये पोप बेनेडिक्ट XVI यांनी त्यांना कार्डिनल केलं होतं. त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या सुधारणावादी विचारांवर अनेकदा प्रखर टीका केली. यांनी देखील घटस्फोटीत आणि पुनर्विवाह करणाऱ्या कॅथोलिकांना पवित्र अन्नाचा अधिकार नाकारला.
नदीजोड प्रकल्पाच्या कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही…मंत्री विखेंची ग्वाही
कार्डिनल लुइस एंटोनियो टैगले यांचं वय 67 वर्ष आहे. ते इतिहासातील पहिले अशियायी पोप ठरतील त्यांना 2012 मध्ये पोप बेनेडिक्ट XVI यांनी त्यांना कार्डिनल केलं होतं. हे कॅथोलिक चर्चमधील सर्वात प्रगतीशील आणि प्रभावशाली चेहरा आहे. त्यांनी पोप फ्रान्सिस यांच्या विचारांना समर्थन दिलेलं आहे. विशषत: LGBTQ समुदाय आणि कुमारी माता, घटस्फोटीत आणि पुनर्विवाह करणाऱ्यांवरील असणाऱ्या बंधनांवर सवाल केला.
दरम्यान या पाच जणांऐवजी शतकांत पहिल्यांदा असं देखील होऊ शकत की, पोप हे अफ्रिकेतून निवडले जाऊ शकतात. कारण अफ्रिकेतील घानाचे पीटर टर्कसन,जे पोंटिफिकल काउंसिल फॉर जस्टिस अॅन्ड पीसचे प्रमुख राहिलेले आहेत. दुसरे कांगोचे फ्रिडोलिन अंबोंगो जे किन्शासाचे आर्चबिशप आहेत. दोघंही कट्टरपंथी आणि पारंपरावादी आहेत. तसेच ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी देखील ओळखले जातात. च