LetsUpp | Govt.Schemes
सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आंबा (Mango), डाळिंब (Pomegranate), केळी(banana), संत्रा(Orange), मोसंबी व चिक्कू या पिकांवरील कीड, रोगांचे सर्वेक्षण (Survey of Diseases) करुन त्याबाबत उपाययोजना सल्ला (Remedial advice)देण्यासाठी 5 जानेवारी 2016 ला ही योजना सुरु करण्यात आली.
Pune News: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली बापट कुटुंबीयांची भेट; गौरव बापट म्हणाले…
योजनेची प्रमुख अट : लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वत:चे फळबाग क्षेत्र असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्र : अर्ज, 7/12 व 8-अ उतारा
लाभाचे स्वरूप असे :
▪ या योजनेंतर्गत कीड सर्वेक्षकांमार्फत प्रत्यक्ष बागांना भेट देऊन कीड किंवा रोगांसंबधात निरीक्षणे घेण्यात येतात. त्यानंतर राष्ट्रीय संशोधन केंद्र(National Research Centre), कृषि विद्यापीठाचे मदतीने सल्ले तयार करून माहिती SMS द्वारे व जंबो झेरॉक्सद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जातात.
▪ कीड / रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्यावर गेल्यास आपत्कालीन परिस्थितीत 50 टक्के अनुदानावर औषधे तालुकास्तरावरुन उपलब्ध करुन दिली जातात.
या ठिकाणी संपर्क साधावा : तालुका कृषी अधिकारी
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)