European Union fines Google : जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलवर अनेकदा इतर ब्रँड्सना बाजारात स्थान निर्माण करू देत नसल्याचा आरोप केला जातो. गुगलच्या या पद्धतींमुळे कंपनीला अनेकदा कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे. आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटला युरोपियन युनियन (EU) नियामकांनी मोठा दंड ठोठावला आहे. EU नियामकांना असे आढळले आहे की Google बाजारात स्पर्धा विरोधी पद्धती काम करत आहे.
युरोपियन युनियनच्या या पावलाने Google च्या अडचणीत वाढ होण्याची शक्य आहे. जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कंपनीच्या ऐकड टेक व्यवसायात गेल्या वर्षी त्याची एकुण कमाईच्या 79 टक्के आले आहेत. याचे कारण की Google या व्यवसायात इतर कंपन्यांना येऊ देत नाही. वर्ष 2022 मध्ये कंपनीने आपली वेगवेगळ्या सेवांतून 24.5 बिलियन (18 लाख करोड़ रुपये) नफा कमवला आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, EU Antitrust चीफ मार्गारेट वेस्टेजर यांनी म्हटले आहे की, Google ला आपल्या adtech व्यवसायाचा काही भाग Google ला विकावा लागेल कारण कंपनीला स्पर्धाविरोधी पद्धतींना आळा घालण्यासाठी इतर कंपन्यांना जागा आणि संधी द्यावी लागेल. जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तपासानंतर युरोपियन युनियनने गुगलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्र्यावरील ईडी कारवाईनंतर स्टॅलिन सरकारचा आक्रमक पवित्रा; CBI साठी दरवाजे बंद
गुगलला करोडो रुपयांचा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी EU, दक्षिण कोरिया आणि भारताच्या एजन्सींनीही कंपनीवर कारवाई केली आहे. गुगलला मोठी बाजारपेठ आहे आणि कंपनीला मक्तेदारी हवी आहे, असे आरोप होत आहेत. अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीममुळे त्याचा युजरबेसही मोठा आहे.
रिसर्च फर्म इनसाइडर इंटेलिजेंसच्या मते, Google सध्या एकूण जागतिक जाहिरात महसूलाच्या 28% मार्केट शेअरसह जगातील सर्वात मोठे डिजिटल जाहिरात प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे इतर ब्रँड्सना जागा मिळत नसल्याने गुगल स्पर्धा संपवत असल्याचे बोलले जात आहे.