Google Certificate Course : आजच्या युगात नोकरीसाठी नवीन टेक्नोलॉजीबाबत माहिती असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे नवीन टेक्नोलॉजीबाबत माहिती नसेल तर नोकरी मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते मात्र आता नोकरीसाठी गुगल तुमची मदत करणार आहे. होय, नवीन टेक्नोलॉजी शिकून नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी गुगल करिअर सर्टिफिकेट कोर्से चालवत आहे. या कोर्सेमध्ये आजच्या काळानुसार तुम्हाला तयार करण्यात येते. त्यामुळे हे कोर्सेस करुन तुम्ही एक उत्तम करिअर सुरु शकतात. या कोर्सेसचा कालावधी 3 ते 6 महिन्यांपर्यंत असतो आणि हे कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन हे कोर्सेस कधीही आणि कुठेही करु शकतात. या कोर्सेससाठी तुम्हाला दरमहा 14 डॉलर्स म्हणजेच 1,196 रुपये खर्च करावे लागतील.
गुगलचे 5 प्रमुख करिअर सर्टिफिकेट कोर्सेस
आयटी सपोर्ट सर्टिफिकेट
गुगलच्या आयटी सपोर्ट सर्टिफिकेट कोर्सेमध्ये तुम्हाला कंप्यूटर नेटवर्किंग, हार्डवअेर आणि सॉफ्टवेअर प्रॉब्लम सोडवणे, ॲडमिनिस्ट्रेशन आणि सेफ्टीबाबत शिकायला मिळतील. हा संपूर्ण कोर्स 6 महिन्यांचा असेल. या कोर्सनंतर तुम्ही आयटी सपोर्ट स्पेशलिस्ट, हेल्प डेस्क टेक्निशियन आणि सिस्टम ॲनालिस्ट म्हणून करिअर बनवू शकता. या फिल्डमध्ये सुरुवातीचा पगार 2.5 लाख ते 4.5 लाख रुपये असू शकतो.
डेटा ॲनालिटिक्स सर्टिफिकेट
गुगलच्या या कोर्समध्ये तुम्हाला एक्सेल आणि एसक्यूएलसह डेटा कलेक्शन, क्लीनिंग आणि व्हिज्युअलायझेशन, डेटा-चालित निर्णय घेणे आणि टॅबलो आणि गुगल शीट्स शिकवले जातात. हा देखील कोर्स 6 महिन्यांचा असतो. या कोर्सनंतर तुम्ही डेटा ॲनालिस्ट, बिझनेस इंटेलिजेंस ॲनालिस्ट आणि डेटा टेक्निशियन इत्यादी बनू शकता, ज्यांचे पगार दरवर्षी 4-8 लाख रुपये आहे.
प्रोजेक्ट मॅनेजमेंट सर्टिफिकेट
गुगलचा हा कोर्स प्रोजेक्ट लाइफ सायकल, टीमवर्क, रिक्स मॅनेजमेंट, अॅजाइल अँड स्क्रम पद्धती, कम्युनिकेशन आणि टाइम मॅनेजमेंट शिकवतो. हा 5-6 महिन्यांचा कोर्स आहे, जो केल्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, प्रोजेक्ट मॅनेजर (एंट्री लेव्हल) आणि ऑपरेशन्स असोसिएट म्हणून करिअर करू शकता. त्यांचा पगार दरवर्षी 4 ते 6 लाख रुपये आहे.
UX डिझाइन सर्टिफिकेट
हा कोर्स रिसर्च आणि UX डिझाइन फाउंडेशन, वायरफ्रेमिंग, प्रोटोटाइपिंग (फिग्मा/अॅडोब XD), युजर्स इंटरफेस डिझाइन (UI) आणि डिझाइन थिंकिंग याबद्दल शिकवतो. हा 6 महिन्यांचा कोर्स आहे, जो केल्यानंतर तुम्ही UX डिझायनर, UI/UX असोसिएट आणि व्हिज्युअल डिझायनर म्हणून नोकरी सुरू करू शकता. त्यांचा पगार दरवर्षी 5 ते 10 लाख रुपये आहे.
5 जुलैसाठी तयारी सुरू, राज- उद्धव एकत्र येताच मनसे- ठाकरे गटात भेटीगाठींना वेग
डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स सर्टिफिकेट
गुगलचा हा सर्टिफिकेट कोर्स एसईओ, एसईएम,सोशल मीडिया मार्केटिंग, गुगल ॲ नालिटिक्स, ईमेल मार्केटिंग, ऑनलाइन स्टोअर तयार करणे आणि चालवणे, ग्राहकांचे वर्तन आणि विक्री वाढवण्याच्या धोरणांबद्दल स्पष्ट करतो आणि शिकवतो. हा 3 ते 6 महिन्यांचा कोर्स केल्यानंतर, तुम्ही डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, सोशल मीडिया मॅनेजर आणि ई-कॉमर्स तज्ञ म्हणून एक उत्तम करिअर बनवू शकता. या फिल्डमध्ये वार्षिक पगार 3.5 लाख ते 7 लाख रुपये आहे.