Government Schemes : श्रावण बाळ योजनेंतर्गत (Shravan Bal Seva State Determination Scheme)65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांना उतार वयात आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. राज्य सरकारच्या (State Govt)श्रावणबाळ राज्य निर्धारण योजनेंतर्गत वृद्धापकाळात त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून सरकारकडून दरमहा 600 रुपये जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात टाकले जातात.
Neha Joshi: अटलबिहारी वाजपेयींच्या आईची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री कोण? जाणून घ्या
योजनेची वैशिष्ट्ये अन् फायदे :
– अर्जदाराला राज्य सरकारकडून प्रवर्ग (A) अंतर्गत दरमहा 600 रुपयांची मदत केली जाते.
– अर्जदारास राज्य शासनाकडून दरमहा 400 रुपये आणि त्याच लाभार्थ्याला इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्तीवेतन योजनेंतर्गत – (B)अंतर्गत केंद्र सरकारकडून दरमहा 200 रुपये निवृत्तीवेतन दिले जाते, असे मिळून लाभार्थ्याच्या बॅंक खात्यामध्ये दरमहा 600 रुपये जमा केले जातात.
Animal नंतर अनिल कपूर पुन्हा सज्ज! कॅप्टन राकेश जयसिंग म्हणून ‘या’ चित्रपटात झळकणार
योजनेसाठी आवश्यक पात्रता:
– श्रावण बाळ सेवा राज्य निर्धारण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असावे.
– दारिद्र्य रेषेखालील (BPL) श्रेणी आणि बिगर बीपीएल श्रेणी या दोन्ही श्रेणींना या योजनेचा लाभ मिळतो.
– अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 21,000 रुपयांपेक्षा अधिक नसावे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :
– विहित अर्ज
– रेशन कार्ड
– वयाचा पुरावा
– उत्पन्नाचा दाखला
– रहिवासी दाखला
– पासपोर्ट आकाराचे फोटो
योजनेसाठी आवश्यक अटी :
वर्ग अ
– अर्जदार हा महाराष्ट्रातील कायमचा रहिवासी असावा.
– अर्जदाराचं वय 65 वर्षे किंवा अधिक असणं आवश्यक.
– अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न 21 हजारांपेक्षा अधिक नसावं.
– अर्जदाराचं नाव बीपीएल यादीमध्ये समाविष्ट नाही.
वर्ग ब
– अर्जदार हा महाराष्ट्रातील कायमचा रहिवासी असावा.
– अर्जदाराचं वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक आवश्यक.
– अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न 21 हजारांपेक्षा जास्त नसावं.
– अर्जदाराचं नाव बीपीएल यादीमध्ये समाविष्ट असावं.
अधिकृत वेबसाइट https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.