Download App

Government Schemes : मुद्रा योजना नेमकी आहे तरी काय? कसा मिळणार फायदा?

Government Schemes : केंद्र सरकारने (Central Govt)लहानमोठ्या उद्योगांना (Industry)अर्थसहाय्य करण्यासाठी मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan Scheme)सुरु केली आहे. या योजनेंतर्गत, लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु करु शकतात किंवा जर त्यांचा आधीपासूनच व्यवसाय असेल तर तो चांगला ग्रो करण्यासाठी देखील लाभार्थी कर्ज मिळवू शकतात. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट देशातील अधिकाधिक युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे आहे. जेणेकरुन देशातील बेरोजगारी (Unemployment)कमी होईल त्याचबरोबर देशाची प्रगती देखील झपाट्याने होईल.

माझे ठाम मत, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय… : फडणवीसांची जहरी टीका

मुद्रा कर्ज योजनेचे फायदे काय?
– देशातील कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु करायचा असल्यास तो या योजनेंतर्गत कर्ज घेऊ शकतो.
– या योजनेंतर्गत देशातील नागरिकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय कर्ज दिले जाते.
– या कर्जासाठी कसलीही प्रोसेसिंग फी घेतली जात नाही.
– मुद्रा योजनेंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवता येतो.
– कर्ज घेणाऱ्या लाभार्थीला मुद्रा कार्ड मिळते, त्याच्या मदतीने व्यावसायिक आपल्या गरजांनुसार खर्च करतो.

Aata Vel Zaali: वयस्कांच्या अस्तित्वाची गोष्ट; ‘आता वेळ झाली’चा भावूक करणारा ट्रेलर रिलीज

मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय?
– आधार कार्ड
– पॅन कार्ड
– अर्जदाराचा कायमचा पत्ता
– व्यवसाय पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
– मागील तीन वर्षांचे Balance Sheet
– इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री आदींचे कोटेशन व बिले.

मुद्रा लोन योजनेसाठी पात्रता काय?
– अर्जदार भारतीय नागरिक असावा.
– कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं.
– अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
– ही योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
– लहान व्यवसाय सुरू करणारे लोक आणि ज्यांना त्यांचा लहान व्यवसाय वाढवायचा आहे ते देखील या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 अंतर्गत कर्जासाठी अर्ज करु शकतात.

कोणत्या बँका लोन देतील?
बँक ऑफ महाराष्ट्र
आयसीआयसीआय बँक
बँक ऑफ इंडिया
कॉर्पोरेशन बँक
अलाहाबाद बँक
j&k बँक
IDBI बँक
कर्नाटक बँक
पंजाब नॅशनल बँक
तामिळनाडू मर्कंटाइल बँक
अॅक्सिस बँक
पंजाब आणि सिंध बँक
सिंडिकेट बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
आंध्र बँक
देना बँक
कॅनरा बँक
कोटक महिंद्रा बँक
सारस्वत बँक
युको बँक
फेडरल बँक
इंडियन बँक
बँक ऑफ बडोदा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया
एचडीएफसी बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स

मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करता येईल?
Udyamimitra पोर्टलवर (www.udyamimitra.in) MUDRA कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

follow us

वेब स्टोरीज