Download App

Government Schemes : शेत जमिनीवर फळझाड लागवड कार्यक्रम योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?

वृक्षनिहाय मंजूर मापदंडानूसार 100 % दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे व 75 टक्के झाडे जिवंत असल्यास अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहिल.

Government Schemes : शेत जमिनीवर (Farm)फळझाड लागवड कार्यक्रम योजनेमार्फत (Fruit Tree Plantation Program Scheme)अधिकाधिक क्षेत्रावर फळबाग लागवड करून रोजगार निर्मिती (Employment generation)करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा (Farmer)आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना राबविली जाते.

मोठी बातमी : आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंना जबर धक्का

या प्रवर्गासाठी योजना लागू :
अ) अनुसुचित जाती
ब) अनुसुचित जमाती
क) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
ड) भू-सुधार योजनेचे लाभार्थी
इ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
फ) कृषि कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्प भू-धारक व सीमांत शेतकरी
ग) अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी

Box Office: कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ची दमदार सुरूवात, पण थिएटरमध्ये कोकणी ‘मुंज्या’चाच बोलबाला

योजनेच्या प्रमुख अटी :
▪ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉबकार्ड असणे आवश्यक.
▪ ग्रामसभेमध्ये लाभार्थी निवड होणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे : लाभार्थींच्या नावावर असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ उतारा.

लाभाचे स्वरूप असे : वृक्षनिहाय मंजूर मापदंडानूसार 100 % दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे व 75 टक्के झाडे जिवंत असल्यास अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहिल.

या ठिकाणी संपर्क साधावा : संबधित मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालय.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us

वेब स्टोरीज