Download App

Government Schemes : सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेतला?

Government Schemes : सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेंतर्गत (Solar Rooftop Subsidy Scheme)राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar panel)बसविण्यासाठी सोलर पॅनलच्या खरेदीवर अनुदान दिले जाते. राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा (Solar energy)वापर करु शकतील. त्यामुळे सरकारवर पडणारा विजेचा भार कमी होणार आहे. राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

अपारशक्ती खुराना अन् रोहित शर्माची जमली गट्टी; धमाल मस्तीचा व्हिडिओ व्हायरल…

सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेचं उद्दिष्ट काय?
नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
घरगुती सौर ऊर्जा योजना ची सुरुवात केंद्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे.

Bhumi Pedanekar : भक्षकच्या यशाचं क्रेडिट देत माध्यामांना, भूमीचं पत्रकारांना ट्रिब्यूट!

योजनेचा लाभ कसा मिळणार?
– सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल.
– सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलवर केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते.
– राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ मिळवू शकते आणि स्वतःच्या घराच्या,कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल बसवू शकते.
– योजनेंतर्गत बसवणाऱ्या सोलर पॅनलची 25 वर्षाची गॅरंटी असते.
– एकदा सोलर पॅनल बसविल्यावर उपभोक्त्याला कुठल्याच प्रकारचा खर्चाची गरज नाही.
– सौर ऊर्जेमुळे निर्माण होणारी जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे, त्यामुळे ग्राहकाला आर्थिक फायदा होणार आहे.
– नागरिकांना लोडशेडिंगचा फटका बसणार नाही व त्यांना लोडशेडिंग पासून मुक्तता मिळेल.
– योजनेंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची किंमत 4 ते 5 वर्षात वसूल होते, त्यामुळे पुढील 20 वर्षे उपभोक्ता मोफत विजेचा वापर करु शकतो.
– सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेंतर्गत नागरिकांना विजेच्या बिलापासून मुक्ती मिळेल.
– या योजनेंतर्गत घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था तसेच निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा फायदा होईल.
– नागरिकांना विजेचे बिल भरण्यासाठी आर्थिक तंगीला सामोरं जावं लागणार नाही.
– या योजनेंतर्गत सोलर पॅनलच्या सहाय्याने मोफत वीज निर्मिती करता येणार.
– या योजनेंतर्गत पर्यावरणाला हानी न पोहचवता वीज निर्मिती करता येणार आहे.
– उर्वरित वीज शासनाला विकत येणार त्यामुळे उपभोक्त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
महाराष्ट्रातील सर्व नागरिक सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र असणार आहेत.

आवश्यक पात्रता
अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम व अटी
ज्या गावात, दुर्गम भागात विजेची जोडणी झालेली नाही, अशा गावांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाते.
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात शासनाकडून मिळते.
– फक्त राज्यातील नागरिकांनाच सोलर रूफटॉप सब्सिडी योज़नेचा लाभ दिला जाईल.
– महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
– एका व्यक्तीला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
– अर्जदार ज्या जागेत सोलर पॅनल बसवणार आहे ती जागा त्याच्या स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे.
– अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
– अर्जदार व्यक्तीचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
– अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्या सोलर योजनेचा लाभ मिळवला असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रेशन कार्ड
पॅन कार्ड
रहिवाशी दाखला
जमिनीचा7/12
बँक खात्याचा तपशील
पासपोर्ट साईज फोटो
उत्पन्नाचा दाखला
मोबाईल नंबर
विजेचे बिल
ज्या जागेवर सोलर पॅनल बसवणार त्या जागेचा तपशील
उत्पन्नाचे प्रमाणपत्र

अनुदान किती मिळते?
या योजनेंतर्गत 3 KW क्षमतेचे सोलर पॅनलच्या खरेदीसाठी राज्य शासनाकडून 40 टक्के अनुदान दिले जाते.
– 3 KW पेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनलच्या खरेदीसाठी 20 टक्के अनुदान दिले जाते.
– सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाते.
– गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करावी लागेल. त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईलच्या मदतीने अर्ज करु शकतो.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us