Download App

Red Rice: लाल तांदळाला आहारात समाविष्ट करण्याचे 7 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Red Rice: वरण-भात, साधं वरण तूप भात, मसाले भात, दाल खिचडी, बिर्याणी हे शब्द ऐकले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. पण अनेकांच या भातावर भरभरून प्रेम असून सुद्धा त्यांना काही कारणास्तव भात खाता येत नाही. (lifestyle news) मग अशा वेळेस करायचं काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर यावर उत्तर आहे लाल तांदूळ. (Health News) लाल तांदळाचा आहारात वापर करून भात प्रेमी हे भात खाण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतात.

वजन कमी करण्यासाठी भात खाणे बंद केले आहे किंवा पांढर्‍या भाताऐवजी ब्राऊन राईस खाणे सुरू केले आहे, जे खूप आरोग्यदायी आहे, असे अनेकांना तुम्ही बोलताना ऐकले असेल. असा आणखी एक भात आहे जो तुम्हाला वजन कमी करण्यास आणि तपकिरी तांदळाप्रमाणेच फिट राहण्यास मदत करतो. तर हा तांदूळ लाल तांदूळ आहे. हा एक विशेष प्रकारचा लांब आणि दाणेदार तांदूळ आहे, ज्याला अँथोसायनिनपासून लाल रंग प्राप्त होतो. लाल तांदूळ, इतर न काढलेल्या तांदळांप्रमाणेच, पॉलिश केलेल्या तांदळाच्या तुलनेत खमंग चव आणि पौष्टिक मूल्य जास्त आहे.

तांदळाचा हा प्रकार जो सामान्यतः आशियाई देशांमध्ये, विशेषतः भारत, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्ये पिकवला जातो. तांदळाच्या या अनोख्या जातीला त्याच्या बाह्य थरातून विशिष्ट लाल रंग प्राप्त होतो, ज्याला कोंडा म्हणतात. पांढरा तांदूळ बनवताना हाच भाग काढून टाकला जातो. ज्यामुळे ते कमी आरोग्यदायी होते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला लाल तांदळाचे असे काही आश्चर्यकारे फायदे सांगणार आहोत जे वाचून तुम्ही नक्कीच तुमच्या घरात या लाल तांदळाचा समावेश कराल. काय आहेत लाल तांदळाचे फायदे जाणून घेऊया.

1. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर – आहारात लाल तांदळाचा वापर केल्याने किंवा लाल भात खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याच कारण की, लाल तांदुळा खाण्याची इच्छा कमी करते आणि पोट हे जास्त काळ भरलेलं वाटू शकतं. हा भात फॅट फ्री असतो. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्यास आळा बसतो.

2. अँटिऑक्सिडेंटने समृद्ध – लाल तांदुळा अँटिऑक्सिडेंटने समृद्ध आहे. हे शरीरातील फ्री रॅडीकल्स अप्रभावशाली करण्यास मदत करतात. यामुळे कॅन्सर, हृदयरोग आणि शुगर यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

3. भरपूर फायबरयुक्त – लाल तांदुळात भरपूर फायबर असते. जे पचनासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते. परिणामी बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

4. मॅग्नेशियमची उपलब्धता – लाल तांदळात मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते, जे हाडांच्या आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे. यामुळे सांधेदुखीच्या समस्यांपासून सुटका मिळते.

5. हाडांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत – लाल तांदळात पोटॅशियम, आयर्न आणि मॅग्नेशियम असतं जे ब्लडप्रेशर व मेटाबोलिझम चांगलं राखण्यास मदत करतात. शरीरातील RBCs म्हणजेच रेड ब्लड सेल्स वाढण्यासाठी लाल तांदळाचा उपयोग होतो. तांदळात पोटॅशियम,आयर्न, मॅग्नेशियम हे हाडांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात.

6. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयोगी – लाल तांदूळ कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. एक अभ्यासानुसार ज्या लोकांनी 6 महिने लाल भात खाल्लेला आहे त्यांच्यामध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

7. जीवनसत्त्वे आणि खनिजे – लाल तांदळात आयर्न, झिंक, विटामिन बी6, विटामिन ई यांसारखी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे विटामिन्स असतात. जे शरीराला लाल रक्तपेशी आणि न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करते जे मूड नियंत्रित करते. त्यात व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट देखील आहे. जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका देखील कमी करू शकते.

Tags

follow us